बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन पुन्हा एकदा मराठी मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती झी मराठीच्या या मालिकेत दिसणार आहे.
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असणारी विद्या बालन लवकरच झी मराठीवरील मालिकेत दिसणार आहे.
विद्या बालनने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. अशातच ती पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
अभिनेत्री विद्या बालनने मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. लवकरच ती झी मराठीवरील 'कमळी' या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत ती एका शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.
ज्यामध्ये ती कमळीला शिक्षणाचे महत्त्व आणि व्यवहार ज्ञानाचे धडे देताना दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा प्रोमो प्रचंड व्हायरल होत आहे.
मालिकेच्या प्रोमोमध्ये विद्या बालन ही कमळीला भारताची आर्थिक राजधानी कोणती? असा प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यावर कमळी उत्तर देते.
त्यानंतर विद्या कमळीला मुंबईतील विमानतळाचं ना काय असा प्रश्न विचारते. त्यावर कमळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं उत्तर देते.
परंतु जेव्हा विद्या कमळीला तिसरा प्रश्न विचारते तेव्हा कमळीची बोबडी वळते. सध्या चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
ही मालिका झी मराठीवर रात्री 9 वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. अभिनेत्रीला मराठी मालिकेत पाहून चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.