Entertainment News : लग्नाच्या सात महिन्यात अभिनेत्री स्वरा भास्कर हिने बाळाला जन्म दिला आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या लग्नाच्या वर्ष होण्या आधीच आई झाल्या.
स्वरा भास्कर आणि फराद अहमद यांनी 6 जानेवारी 2023 लग्न केलं. त्यानंतर 6 जूनला ती गरोदर असल्याची घोषणा केली. त्यानंतर 23 सप्टेंबरला म्हणजे तब्बल 7 महिन्यात तिला बाळ झालं आहे.
रणबीर कपूर-आलिया भट्ट लग्नानंतर 7 महिन्यांतच आई-वडील झाले. त्यांच्या मुलीचं नाव राहा आहे. त्यांनी अजून तिची झलक दाखवलेली नाही.
अभिनेत्री दिया मिर्झा आणि वैभव रेखी यांनी विवाह 15 फेब्रुवारी 2021 ला लग्न केलं. त्यानंतर अवघ्या 3 महिन्यांतच तिला मुलगा झाला. त्याचं नाव अवयान आझाद रेखी आहे.
लग्नापूर्वीच नेहा धुपिया प्रेग्नेंट होती. म्हणून नेहा आणि अंगद बेदीने 10 मे 2018 ला लग्न केले. त्यानंतर नोव्हेंबर 2018 मेहरचा जन्म झाला.
अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि क्रिकेटर हार्दिक पंड्या यांनी घाईघाई 2020 मध्ये एंगमेजमेंट केली त्यानंतर या स्टार जोडप्याला जुलै 2020 मध्ये मुलगा अगस्त्य झाला.
श्रीदेवीने 2 जून 1996 ला बोनी कपूरशी लग्न केलं. लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांना पहिली मुलगी जान्हवी झाली.
कबीर सिंग स्टार्स शाहिद कपूर आणि मीरा राजपूत कपूर यांनी देखील त्यांच्या लग्नाच्या एका वर्षाच्या आत आई बाबा झाले.
अभिनेत्री राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांचं लग्न 2014 मध्ये झालं.या जोडप्याला नोव्हेंबर 2015 मध्ये मुलगी झाली. तिचं नाव आदिरा आहे.
कोंकणा सेन लग्नापूर्वी प्रेग्नेंट होती. त्यामुळे तिने रणबीर शौरीसोबत घाईत लग्न केलं. त्यांना एक मुलगा आहे. पण आज कोंकणा आणि रणबीर एकत्र राहत नाहीत.