बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबाबत सांगणार आहोत. जो बॉलिवूडचा महाफ्लॉप अभिनेता आहे.
बॉलिवूडमधील या अभिनेत्याला सिनेसृष्टीत 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्यामध्ये अभिनेत्याने 3 चित्रपट दिले आहेत. जे बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरले.
आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव झहीर इक्बाल आहे. झहीरने सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनलेल्या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली.
झहीर इक्बालसोबत या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री नूतन यांची नात प्रनूतन होती. मात्र, जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरला.
त्यानंतर झहीर इक्बाल हा 'डबल एक्सल' या चित्रपटात दिसला. अभिनेत्याचा हा चित्रपट देखील फ्लॉप ठरला. या चित्रपटात झहीरच्या विरुद्ध भूमिकेत सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी होत्या.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे बजेट 15 कोटी रुपये होते. प्रदर्शित होताच हा चित्रपट अनेक दिवस बॉक्स ऑफिसवर होता. पण या चित्रपटाने 5 कोटींपेक्षा कमी कमाई केली होती.
2024 मध्ये झहीर इक्बालचा 'रुसलान' चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा देखील चित्रपट खूप कमाई करु शकला नाही. या चित्रपटात आयुष शर्मा, विद्या मालवडे आणि सुनील शेट्टी होते.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 7 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 23 जूनला लग्न केलं. सोनाक्षी सिन्हा बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.