अनेक सेलिब्रिटी प्रेमासाठी धर्म बदलणारे आणि नंतर लग्न करणारे आहेत. पण असा एक सेलिब्रिटी आहे ज्याने प्रेमासाठी चक्क जेंडर बदलले. तरीही धोका मिळाला.
प्रेम आंधळं असतं हे उगच लोक विनाकारण म्हणत नाहीत. कारण प्रेमासाठी काही लोक धर्म तर काही लोक जेंटर बदलतात आणि अनेकजण फसवणुकीचे बळी ठरतात.
आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील ट्रान्सजेंडर अभिनेत्रीसोबत घडलेली अशीच एक घटना सांगणार आहोत जिचे वैयक्तिक आयुष्य खूप वेदनादायक राहिले.
या ट्रान्सजेंडर अभिनेत्रीचे नाव बॉबी डार्लिंग असं आहे. नुकतेच तिने एका मुलाखतीत तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.
यावेळी तिने प्रेमासाठी जेंडर बदलल्याची माहिती दिली. जेंडर बदलून तिने लग्न केलं. काही दिवसांनंतर तिला धोका मिळाला. तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले.
फेसबुकवर त्याने मला रिक्वेस्ट पाठवली. स्वत: कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगितलं. त्याने मला जे काही सांगितलं ते सर्व खोट होतं, त्याने मला फसवलं.
त्यावेळी मी त्याच्या प्रेमात कशी पडले समजले नाही. परंतु, प्रेमात पडल्यानंतर मला कळले की तो मला फसवत आहे. प्रेम सिद्ध करण्यासाठी मी माझ्या शरीराचा एक भाग कापला. पण त्याने माझा वापर केला.
त्याच्यासाठी मी स्वत:ला बदललं. यापेक्षा मोठं काय असू शकत नाही. तेव्हा माझ्या वडिलांना टोमणे सहन करावे लागले. तुमच्या मुलाचे लग्न मुलाशी झालं आहे असं म्हणायचे.
मी त्याच्यासाठी सर्व काही केलं पण तो फक्त माझ्या पैशाच्या आणि मालमत्तेच्या मागे लागला होता. त्याच्यासाठी मी लग्न केले नाही तर माझे शरीरही बदलले होते.
मात्र, त्याने मला घटस्फोट दिला. मी एकटी पडली. कदाचित ही माझ्या कृत्याची शिक्षा असावी. कारण मी माझ्या पालकांना खूप त्रास दिला होता असं बॉबी डार्लिंग म्हणाली.