Bollywood Celebrities Favourite Food List: आपण अनेकदा पाहतो की बॉलिवूड कलाकार फिट राहण्यासाठी डाएट करतात आणि नियमित व्यायामही करतात. पण, हे सगळं करत असतानाही त्यांची काही खास आवडती डिशेस असतातच. तर पाहूयात तुमच्या आवडत्या बॉलिवूड स्टार्सना कोणते खाद्यपदार्थ खायला आवडतात.
विदेशात राहूनसुद्धा प्रियंका चोप्राची भारतीय चव अजूनही तशीच आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की, तिला पिझ्झा किंवा सँडविचसोबत लोणचं खायला खूप आवडतं. याशिवाय 'मक्के दी रोटी' आणि 'सरसों दा साग' तिच्या आवडत्या पंजाबी डिशेस आहेत.
करीना कपूरने मुलाखतीत सांगितले की, चायनीज खाद्यप्रेम केवळ तिचं नाही, तर संपूर्ण कपूर कुटुंबाचं आहे. फॅमिली डिनर असो किंवा गेट-टुगेदर, चायनीज फूड हे त्यांचं नेहमीचं पहिलं पसंतीचं असतं.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान मिठाईचा खूप शौकीन आहे. वेळ मिळाला की तो त्याच्या आवडत्या मिठाईच्या दुकानातून मिठाई मागवून खातो.
हृतिकला बर्गर खूप आवडतात आणि आपल्या चीट मीलमध्ये तो हमखास बर्गर खातो. इतकंच नाही, तर सिनेमा पाहताना तो एकाच दमात 8 समोसेसुद्धा फस्त करतो.
दीपिकाला दक्षिण भारतीय पदार्थ खूप प्रिय आहेत. इडली, मसाला डोसा आणि रसम राईस हे तिचे फेव्हरेट आहेत. याशिवाय, तिला भूटानी डिश 'एमा दात्शी' देखील खूप आवडते.
सलमान खानला मसालेदार पदार्थ खूप आवडतात. विशेषतः त्याच्या आईने बनवलेली चिकन बिर्याणी तो खूप आवडीने खातो.
रणवीर सिंगला सिंधी करी आणि अरबी टिक्का भातासोबत खायला खूप आवडतात. त्याच्या आजीने बनवलेले बेसनाचे लाडू त्याच्या गोड पदार्थाच्या यादीत आहेत.
आलियाला साधं पण चविष्ट जेवण आवडतं. डाळ-भात आणि भेंडीची भाजी हे तिचं आवडतं कॉम्बिनेशन आहे. तिचा आवडता मिल्कशेक ती कधीही विसरत नाही.
सोनमला मुंबईचं स्ट्रीट फूड खूप आवडतं, विशेषतः पावभाजी ही तिला खूप आवडीने खायला आवडते.
आई होण्याच्या वाटेवर असलेल्या कियाराला मुंबई स्टाईलचा मसाला टोस्ट सँडविच खूप आवडतो, असं तिने एका मुलाखतीत सांगितले होते.