Love Affairs: आमिर खानपासून ते हृतिक रोशनपर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्यांना घटस्फोटानंतर खरे प्रेम मिळाले. मुलांसमोर हे कलाकार त...
बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे अभिनयासोबतच सोशल मीडियावर त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. असेच काही कलाकार आहेत, जे घटस्फोटानंतर चर्चेत आलेत.
बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांनी घटस्फोटानंतर खरं प्रेम मिळालं आहे. काही दिवसांआधीच आमिर खान त्याच्या गर्लफ्रेंड गौरीमुळे चर्चेत आला आहे.
'सितारा जमीन पर' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी आमिर खान त्याच्या प्रेयसी गौरीचा हात धरून बसलेला दिसला. यावेळी तिथे त्याचा मुलगा आझाद देखील उपस्थित होता.
सैफ अली खान अमृता सिंगशी घटस्फोट झाल्यानंतर करीनाच्या प्रेमात पडला. अशातच सैफ सारा आणि इब्राहिम यांना घेऊन करीनासोबत फिरायचा.
अभिनेत्री मलायका अरोराने अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली. या दोघांनी त्यांचे नाते सार्वजनिक ठेवले. मलायका तिचा मुलगा अरहानला सोबत ठेवते.
हृतिक रोशनपासून घटस्फोट घेतल्यानंतर सुजैन खानने तिचे अर्सलान गोनीसोबतचे नाते सार्वजनिक केले आहे. सुजैन अनेकदा तिच्या दोन्ही मुलांना तिच्यासोबत ठेवते.
अरबाज खान देखील शूराच्या प्रेमात पडला होता. त्याने सर्वात प्रथम शूराची ओळख त्याच्या मुलाशी करून दिली. लग्नातही अरबाजने मुलगा अरहानला सोबत ठेवले होते.
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या मनात देखील सध्या सबा आझाद आहे. दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. दोन मुलांचा बाप असणारा हृतिक रोशन अनेकदा सबाला आपल्यासोबत ठेवतो.