PHOTOS

27 वर्षांमध्ये कमावले फक्त 7 कोटी, इंडस्ट्रीतील 'या' अभिनेत्याला ओळखलं का?

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. परंतु, इंडस्ट्रीमध्ये असा एक अभिनेता ज्याला 11 चित्रपटांमधून नाही तर एका टीव्ही शोने दिली प्रसिद्धी. 

Advertisement
1/7

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात टीव्हीमधून केली.ज्यामध्ये शाहरुख खान, सुशांत सिंग राजपूत, आयुष्मान खुराना, विद्या बालन सारख्या कलाकारांचा समावेश आहे. 

2/7

या टीव्ही शोमधून त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. परंतु, इंडस्ट्रीमध्ये असा एक कलाकार आहे, ज्याला चित्रपटांमधून प्रसिद्धी मिळाली नाही.

3/7

मात्र, अभिनेत्याला टीव्ही शोमधून प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आज तो घराघरात पोहोचला आहे. आम्ही तुम्हाला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहबद्दल सांगत आहोत. 

4/7

सुशांत सिंह आज त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 9 मार्च 1972 रोजी उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे झाला.  सुशांतला पहिल्या पासूनच अभिनयाची आवड होती. 

5/7

त्यामुळे त्याने थिएटरपासून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 1998 मध्ये त्याने 'सत्या' हा पहिला चित्रपट केला. 

6/7

सुशांत सिंहच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं म्हटलं तर त्याने मोहिना सिंगशी लग्न केलं आहे. त्याला दोन मुलं आहेत. तो सामाजिक विषयांवर उघडपणे आपले मत मांडत असतो. 

7/7

रिपोर्टनुसार, सुशांत सिंहची एकूण संपत्ती सुमारे 7.5 कोटी रुपये इतकी आहे. त्याने 27 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. 





Read More