Deepika Padukone Affairs : चर्चेत येण्यासाठी आणि प्रकाशझोतात राहण्यासाठी दीपिकाचं नाव नेमकं कोणाकोणाशी जोडलं गेलं माहितीये? यातले दोघंजण तर आजच्या घडीला कुठेच दिसत नाहीयेत...
लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंग याची पत्नी दीपिका ही तिच्या खासगी आयुष्यामुळंही कायमच चर्चेत राहिली आहे. याला वाव देणारं एक कारण होतं, ते म्हणजे तिचे अफेअर्स. प्रसिद्धीझोतात येण्याआधी किंवा प्रसिद्धीझोतात आल्यानंतरही तिथं टिकून राहण्यासाठी म्हणा दीपिकाचं नाव अशा व्यक्तींशी जोडलं गेलं ज्यांच्याभोवती आधीपासूनच चर्चा आणि लोकप्रियतेचं वलय होतं.
दीपिकाचं सर्वात गाजलेलं प्रेमप्रकरण होतं ते म्हणजे अभिनेता रणबीर कपूरसोबतचं. ती त्याच्या प्रेमात इतकी आकंठ बुडालेली होती की, तिनं त्याच्या नावाचा टॅट्टूही काढला होता. पण, या नात्यात मीठाचा खडा पडला आणि गोष्टी बिनसल्या.
भारतीय क्रिकेट संघातील आणखी एक खेळाडू, युवराज सिंग यालाही दीपिकानं डेट केलं. पण, त्यांचं नातं अर्ध्यावरच तुटलं.
कॅप्टन कूल, महेंद्र सिंह धोनी याला दीपिका पहिल्यांदाच एका पार्टीत भेटलो होते. त्यावेळी या दोघांमध्ये मैत्रीपलीकडेही खास नातं असल्याचं म्हटलं गेलं.
हे नाव अनपेक्षित असू शकतं. पण, मॉडेल आणि अभिनेता उपेन पटेललाही डेट केलं होतं. सध्या उपेन फारसा कुठेच दिसत नाही.
दीपिकाचं नाव आणखी एका मॉडेलशी जोडलं गेलं होतं. ते नाव म्हणजे अभिनेता मुजम्मिल. सिद्धार्थपासून दुरावा पत्करल्यानंतर दीपिकानं मुजम्मिलशी जवळीक साधली होती. आज तोसुद्धा फारसा कुठंच दिसत नाही.
मद्यसम्राट विजय माल्ल्याचा मुलगा, सिद्धार्थ हासुद्धा दीपिकाचा प्रियकर होता अशा चर्चा समोर आल्या. 2011-12 दरम्यान आयपीएल सामन्यांच्या वेळी त्या दोघांनी एकत्र हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं होतं.
2007 मध्ये 'ओम शांती ओम' या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या दीपिकाचं नाव मॉडेल आणि अभिनेता निहार पंड्याशी फार सुरुवातीच्या काळात जोडलं गेलं होतं. असं म्हणतात की ते रिलेशनशिपमध्येही होते. सध्या मात्र निहार काहीच पत्ता नाही.