आज आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याचे तीन भाग प्रदर्शित झाले. सर्वच भाग बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.
...बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत. ज्यांचे पुढील पार्ट देखील हिट ठरले होते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत.
2004 ते 2013 या कालावधीत एकाच चित्रपटाचे 3 भाग प्रदर्शित झाले होते. बॉक्स ऑफिसवर तिन्ही भागांनी कब्जा केला होता.
तिन्ही भागांना बॉक्स ऑफिसवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये पहिल्या भागात जॉन अब्राहम, दुसऱ्या भागात ऋतिक रोशन आणि तिसऱ्या भागात आमिर खान दिसला होता.
आम्ही तुम्हाला 'धूम' चित्रपटाबद्दल बोलत आहेत. 'धूम' चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट होता. हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.
रिपोर्टनुसार, 2004 मधील सर्वात जास्त कमाई करणारा हा तिसरा चित्रपट होता. या चित्रपटात अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, उदय चोपडा, ईशा देओल आणि रिमी सेन मुख्य भूमिकेत होते.
त्यानंतर 2006 मध्ये 'धूम 2' चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट 2006 मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला होता. प्रदर्शित होताच हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.
2013 मध्ये 'धूम 3' चित्रपट प्रदर्शित झाला. हा देखील एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट होता. 2013 मधील सर्वात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला होता. आता चाहते या चित्रपटाच्या चौथ्या भागाची वाट पाहत आहेत.