ल्युटीन हे कॅरोटीनॉइड आहे जे मिरचीमध्ये विशेषत: हिरव्या, कच्च्या मिरच्यांपासून मिळते. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या मदतीने अनेक आजार टाळता येतात.
ल्युटीन विशेषतः मिरची, सेलेरी, गाजर आणि कॅमोमाइल चहामध्ये आढळते. चला जाणून घेऊया मिरचीपासून मिळणाऱ्या या ल्युटीनचे नक्की कोणते फायदे आहेत.
ल्युटीन हे एक प्रभावी अँटिऑक्सिडंट आहे. जे तुमच्या शरीराला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. हे रॅडिकल्समधील नुकसानकारक घटकांशी लढते आणि पेशींचे संरक्षण करण्यास मदत करते.
ल्युटीनचा वापर सर्वसाधारणपणे तणाव कमी करण्यासाठी आणि मानसिक शांती वाढवण्यासाठी केला जातो. यामुळे तुमचा मूड चांगला होऊ शकतो.
ल्युटीनमध्ये दाहक-विरोधी म्हणजेच अॅन्टी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे जळजळ कमी करण्यास मदत होऊ शकते. हे आपले आरोग्य चांगले ठेवण्यास आणि रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करू शकते.
ल्युटीनयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारले जाऊ शकते. हृदयविकाराचा झटका, ट्रिपल वेसल आणि कोरोनरी आर्टरी संबंधीत समस्यांपासून संरक्षण देते.
वनस्पतींवर आधारित खाद्यपदार्थांमध्ये आढळणाऱ्या ल्युटीनमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. हे कर्करोगास कारणीभूत घटकांविरुद्ध कार्य करते आणि या गंभीर आजारापासून आपले संरक्षण करते.
ल्युटीन मिळणाऱ्या पदार्थाचे सेवन केल्यास हाडांचे आरोग्य सुधारते. त्याचबरोबर हे तुमची हाडे मजबूत करण्यास आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)