तात्काळमध्ये ट्रेनचं तिकिट बुक करायचंय? वाचा योग्य वेळ कोणती व कसं करता येईल.
अनेकदा असं होतं की तात्काळ तिकिट बुक करण्यासाठी तुम्ही वेळेतच लॉगिन करतात. मात्र तरीदेखील तुम्हाला कन्फर्म तिकिट मिळत नाही. अनेकदा योग्य वेळी लॉगिन केल्याचा प्रयत्न केल्यानंतर जास्त वेबसाइटवर जास्त ट्रॅफिक असल्याने साइट हँग होते.
तात्काळ तिकिट बुक करण्याची योग्य वेळ कोणती? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
IRCTCच्या साइटवर तुम्ही तात्काळ तिकिट बुक करु शकता. नियमांनुसार, प्रत्येक दिवशी AC कॅटगिरीच्या ट्रेनसाठी तात्काळ बुकिंग सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सुरू होते. तर, ट्रेनच्या स्लीपर क्लाससाठी तात्काळ तिकिट बुक करण्याची वेळी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सुरू होते.
एसी किंवा स्लीपर तिकिट बुक करण्यासाठी तुम्हाला निर्धारित वेळेच्या 3-5 मिनिटे आधी लॉगिन करावे लागणार आहे. असं केल्यानं तुम्ही अगदी वेळेत कोणत्याही कटकटीशिवाय लॉगिन करण्याची शक्यता वाढता.
तात्काळ बुकिंगसाठी तुम्हाला 10 ते 15 मिनिटे आधी लॉगिन करु नका. असं केल्यानं तात्काळ विंडो सुरू होताच तुमचं लॉगिन सेक्शन एक्सपायर होऊन जाईल
तात्काळ बुकिंग करण्याआधी तुम्हाला IRCTCच्या ऑफिशियल साइटवर जाऊन मास्टर लिस्टदेखील बनवावी. असं केल्याने तात्काळ बुकिंगच्यावेळी पॅसेंजरचे डिटेल्स भरण्यात वेळ जाणार नाही. तसंच, तुमचा डिटेल्स भरण्याचा वेळही कमी होईल.