सगळेच Brezza, Nexon घेतायत... आम्हाला काहीतरी नवं हवं, असा सूर आळवणारे तुमच्याही नजरेत आहेत का?
अशा सर्वच मंडळींसाठी ही अफलातून एसयूव्ही एक उत्तम पर्याय असेल. ती म्हणजे Hyundai Venue
वेन्यूचं 1.0 लीटरचं टर्बो पेट्रोल इंजिन 120पीएस/172एनएम जनरेट करतं. यासोबत 6-स्पीड आयएमटी आणि 7-स्पीड डीसीटीचे पर्याय मिळतात.
यामध्ये तुम्हाला तीन इंजिनचे पर्याय मिळतील. या कारचं 1.2 - लीटर पेट्रोल इंजिन 83पीएस/114एनएम जनरेट करतं. यात 5 स्पीड गिअरबॉक्सही देण्यात आला आहे.
7.68 लाख रुपयांपासून 13.11 लाख रुपयांपर्यंतच्या (एक्स शोरूम) किमतीत तुम्ही ही कार खरेदी करु शकता.
या कारमध्ये तुम्हाला कनेक्टेड कार टेक्नोलॉजीसोबत अॅलेक्सा, गूगल वॉईस असिस्टंट, 8 इंचांचं टचस्क्रीन आणि सनरुफ असे फिचर्स मिळतात.
4-वे पॉवर्ड ड्रायवर, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, वायरलेस फोन चार्जिंग, ऑटो एसी, कूल्ड ग्लवबॉक्स, एबीएससोबत ईबीडी, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, टीपीएमएस, हिल-होल्ड असिस्ट, 4 एअरबॅग्ससारखे फिचर्स मिळतील.