PHOTOS

Jio सोबत थेट स्पर्धा करतोय BSNL चा 'हा' प्लान; कमी किंमतीत भरपूर डेटा, वॅलिडीटी

वर्षांपूर्वी देशातील खासगी कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्याने बीएसएनएल पुन्हा एकदा चर्चेत आले.

Advertisement
1/7
मुकेश अंबानींची डोकेदुखी वाढवतोय BSNL चा हा प्लान; कमी किंमतीत भरपूर डेटा, वॅलिडीटी
मुकेश अंबानींची डोकेदुखी वाढवतोय BSNL चा हा प्लान; कमी किंमतीत भरपूर डेटा, वॅलिडीटी

bsnl recharge plan:  BSNL ही देशातील एक प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आहे. जी खासगी टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धा करतेय. वर्षभरापूर्वी देशातील खासगी कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्याने बीएसएनएल पुन्हा एकदा चर्चेत आले.

2/7
स्वस्त रिचार्ज प्लॅन
स्वस्त रिचार्ज प्लॅन

खासगी कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनचे दर वाढवल्यानंतर बीएसएनएल त्यांच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी ओळखले जाऊ लागले. यामुळेच अनेक युजर्सनी त्यांचे नंबर बीएसएनएलकडे पोर्ट केले आहेत. कमी किमतीत जास्तीत जास्त फायदे देणाऱ्या बीएसएनएलच्या प्लानबद्दल जाणून घेऊया.

3/7
रिचार्ज प्लान
रिचार्ज प्लान

बीएसएनएल आपल्या यूजर्सना विविध किंमती कॅटगरींमध्ये अनेक रिचार्ज प्लान ऑफर करत आहे. ज्यामध्ये विविध फायदे येतात. डेटा आणि वैधतेनुसार हे फायदे बदलतात.

4/7
पोर्टफोलिओ
पोर्टफोलिओ

बीएसएनएलच्या पोर्टफोलिओकडे बारकाईने पाहिले तर तुम्हाला कमी किमतीत अधिक फायदे देणारे प्लान सापडतील. 

5/7
प्लानची किंमत
प्लानची किंमत

बीएसएनएलच्या या प्लानची किंमत 485 रुपये आहे. या प्लानमध्ये तुम्हाला 80 दिवसांची वॅलिडीटी मिळते. यात तुम्हाला फ्री कॉालिंग आणि मेसेजची सुविधा मिळते.

6/7
कॉलिंग आणि एसएमएस
कॉलिंग आणि एसएमएस

या प्लॅन अंतर्गत यूजर्स देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर हवे तितके कॉलिंग करू शकतात. तसेच यूजर्सना कोणत्याही नेटवर्कवर दररोज 100 एसएमएस पाठविण्याची सुविधा मिळते.

7/7
दैनंदिन डेटा
दैनंदिन डेटा

या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 2GB डेटाची सुविधा मिळते. मात्र 2GB डेटानंतर वेग कमी होऊन 40kbps होईल. असे असले तरी यूजर्स इंटरनेट ब्राउझ करण्यासाठी याचा वापर करू शकतात.





Read More