Union Budget 2023 Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुन्हा एकदा यंदाच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या आहेत.
2019 मध्ये मोदी सरकारकडून ब्रिटीशांपासून सुरु असणारी परंपरा मोडित काढण्यात आली. जिथं सूटकेस/ ब्रीफकेसमधून अर्थसंकल्प आणण्याची प्रथा बंदच करण्यात आली. अर्थसंकल्प आणण्यासाठी एका लाल रंगाच्या कापडाचा वापर केला जाऊ लागला.
आता तो लाल रंगाच्याच कापडातून का आणला जातो? असे अनेक प्रश्नही देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना विचारण्यात आले. ज्याचं उत्तरही त्यांनी दिलं.
मला सूटकेस किंवा ब्रीफकेस आवडत नाही. त्यामुळं माझ्या आईनं लाल रंगाच्या कापडापासून एक बॅगवजा आवरण तयार केलं. त्याची यथासांग पूजा केली आणि मग मला ते दिलं.
ही सर्वसाधारण पिशवी वाटू नये यासाठी तिनं त्यावर सरकारी ओळख देण्यासाठी म्हणून अशोकस्तंभाचं चिन्हंही लावलं. याशिवायही अनेक कारणं असल्याचं त्या म्हणाल्या.
2019 च्या आधी सूटकेस आणि ब्रीफकेसमध्येच अर्थसंकल्प आणला जात होता. पण आताच्या सरकारमध्ये मात्र अशा गोष्टींच्या देवाणघेवाणीची परंपरा नसल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. (सर्व छायाचित्र सौजन्य- एएनआय)