ित अर्थमंत्री निर्मला सितारमण येत्या जुलैमध्ये 2024 -25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे आता सर्वांची उत्...
मोदी सरकार 3.0 च्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर निर्मला सीतारमण यांनी बुधवारी सलग दुसऱ्यांदा अर्थ मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला.
वित्त सचिव सोमनाथन आणि इतर उच्च अधिकाऱ्यांनी सीतारमण यांचे नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालयात स्वागत केलं अन् त्यांना शुभेच्छा दिल्या.
निर्मला सितारमण 2024 -25 साठी हा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थमंत्री सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.
आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात निर्मला सितारमण यांनी पुन्हा सरकार स्थापन केल्याने पुन्हा निर्मला सितारमण यांना पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न केलाय.
जुलैमध्ये सीतारमण आपला सलग सातवा आणि सलग सहावा पूर्ण अर्थसंकल्प सादर करतील. यंदाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सितारमण नवा विक्रम रचणार आहेत.
सलग तिसऱ्यांदा मंत्री म्हणून सामील होणाऱ्या पहिल्या महिला मंत्री होण्याचा विक्रमही सीतारमण यांच्या नावावर आहे. अरूण जेठली यांच्यानंतर त्यांनी पदभार स्विकारला होता.
दरम्यान, आगामी अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळणार? असा सवाल विचारला जातोय. निर्मला सीतारमण कोणते नवे बदल करणार? यावर देखील सर्वांचं लक्ष आहे.