Budh Gochar 2023 : ग्रहांचा राजकुमार संपत्ती, बुद्धिमत्ता आणि तर्काचा दाता बुध ग्रह पुढील 2 महिने 3 राशींसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांना 1 ऑक्टोबपर्यंत अमाप धनलाभ होणार आहे.
बुध ग्रह सूर्याची रास सिंह राशीत असून 1 ऑक्टोबरपर्यंत तो इथे विराजमान असणार आहे. तीन राशीच्या आयुष्यात राजासारखं जीवन येणार आहे.
या काळात बुध अस्त होणार आणि त्याचा उदय पण होणार आहे. याचा परिणाम लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण खूप शुभदायी ठरणार आहे. तुमचं धैर्य आणि शौर्य पुढील दोन महिने वाढणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
अडकलेले पैसे परत मिळणार आहे. वादातून किंवा कुठल्या प्रकरणातून तुमची सुटका होणार आहे. भावा बहिणीचे सहकार्य मिळेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे.
बुधाचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांना खूप लाभदायक ठरणार आहे. या लोकांच्या जीवनात भौतिक सुख वाढणार आहे. तुम्हाला भरपूर पैसे अचानक मिळणार आहे.
व्यावसायिक जीवनात मोठे यश मिळेल. तुम्हाला इच्छित पद आणि पैसा मिळेल. तुमच्या करिअरमधील प्रगतीमुळे तुम्हाला खूप दिलासा मिळेल. आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी पुढील दोन महिने वरदान ठरणार आहेत. या लोकांचे भाग्य बुध ग्रहामुळे चमकणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे.
समाजात मानसन्मान वाढणार आहे. कार्यक्षेत्रात तुमचं पद वाढणार आहे. तुमची जुनी इच्छा पूर्ण होईल. धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)