PHOTOS

शनिसोबतच बुधाची 'या' 3 राशींवर वक्री नजर, 22 जुनपासून सुरु होईल कठीण काळ; करिअरमध्ये येतील समस्या

ली स्थिती बदलणार आहे. बुध सध्या आपल्या स्वतःच्या राशी मिथुनमध्ये आहे, पण तो लवकरच कर्क राशीत प्रवेश करणार आहे. हा बुधाचा गोचर काही लोका...

Advertisement
1/8

या गोचराचा परिणाम प्रत्येक राशीवर वेगळा असेल, पण खास 3 राशींसाठी हा बदल थोडा त्रासदायक ठरू शकतो. 

2/8

लोकांना मानसिक अस्वस्थता, गैरसमज, आर्थिक तणाव किंवा नात्यांमध्ये ताणतणाव यांसारख्या समस्या जाणवू शकतात.

3/8

ज्योतिशशास्त्रानुसार, 22 जून रोजी बुध गोचर करत कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 30 ऑगस्ट पर्यंत बुध हा कर्क राशीत राहणार आहे. या सगळ्यात 18 जुलै रोजी बुध वक्री होणार आणि 11 ऑगस्ट रोजी पुन्हा मार्गी लागणार. 

4/8

अशा प्रकारे बुध ग्रह जवळपास 70 दिवसांपर्यंत कर्क राशीत राहणार आहे. बुध ग्रहाचं गोचर हे सगळ्या राशींवर शुभ-अनुभ असा परिणाम करणार आहे. यात सिंह आणि धनु राशीवर शनी साडेसाती सुरु आहे. 

5/8

बुधचं गोचर हे या दोन राशींना इतरांच्या तुलनेत थोडं जास्त स्ट्रगल करावं लागू शकतं. या लोकांना करिअर, आर्थिक परिस्थितींमध्ये नुकसान होऊ शकतं. जाणून घ्या बुध गोचर कोणत्या राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकते.

6/8

सिंह राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं सध्याचं गोचर काहीसं सावधगिरीने हाताळावं लागणार आहे. करिअरमध्ये चढ-उतार होण्याची शक्यता आहे. तुमची एखादी लहानशी चूकही मोठं नुकसान करून जाऊ शकते, त्यामुळे कामाच्या ठिकाणी फारच काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. कुटुंब जीवनातही थोडे ताण-तणाव येऊ शकतात. पार्टनर किंवा जवळच्या व्यक्तींशी बोलताना प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. 

7/8

धनु राशीवर शनीची ढैय्या आहे. बुधाच्या गोचरामुळे अचानक नकारात्मक बदल होऊ शकतात. तब्येतीची काळजी घ्या, करिअरमध्ये बदल, वरिष्ठांशी वाद, वाहन चालवताना सतर्क राहा आणि कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम ठेवा.

8/8

बुधाचं गोचर कुंभ राशीच्या लोकांना शत्रूपासून त्रास देऊ शकतो. विरोधक अडथळे आणू शकतात, त्यामुळे सावध राहा. चुकीच्या लोकांपासून दूर रहा. वेळ आणि पैशाची नासाडी होऊ शकते, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Read More