PHOTOS

Budhaditya Rajyog: सूर्य-बुध बनवत आहे बुधादित्य राजयोग, या 3 राशींचे भाग्य उजळणार; हाती भरपूर पैसाच पैसा

Budhaditya Rajyog :  बुध आणि सूर्य ग्रहाच्या युतीमुळे कन्या राशीमध्ये बुधादित्य राजयोग तयार होणार आहे, ज्याचा सर्व राशींवर प्रभाव पडणार आहे.

Advertisement
1/6

बुधादित्य राजयोग (Budhaditya Rajyog) तयार झाल्यामुळे धनु राशीच्या (Sagittarius) लोकांना करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते, कारण गोचर कुंडलीवरुन दहाव्या घरात बुधादित्य योग तयार होणार आहे आणि तो कर्मक्षेत्राचे घर मानला जातो.

2/6

धनु (Sagittarius)  राशीच्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा जुन्या नोकरीत वाढ होऊ शकते. याशिवाय व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगले पैसे मिळू शकतात आणि व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. राजकारणाशी संबंधित लोकांनाही यश मिळू शकते.

3/6

बुधादित्य राजयोग (Budhaditya Rajyog)  तयार झाल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना व्यवसाय आणि करिअरमध्येही मोठे यश मिळू शकते, कारण हा राजयोग 11व्या स्थानी असणार आहे आणि तो उत्पन्नाचे घर मानला जात आहे.

4/6

वृश्चिक राशीच्या  (Scorpio) लोकांचे उत्पन्न वाढेल आणि ते नवीन मार्गाने पैसे कमवू शकतील. व्यावसायिक लोक त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करून चांगले पैसे कमवू शकतात. याशिवाय, तुम्ही मालमत्ता आणि वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता.

5/6

बुधादित्य राजयोगाच्या (Budhaditya Rajyog) निर्मितीमुळे सिंह राशीच्या लोकांच्या जीवनातही महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात, कारण सिंह राशीपासून दुस-या भावात बुधादित्य राजयोग तयार होणार आहे आणि ज्योतिषशास्त्रात याला संपत्तीचे घर मानले जाते.

6/6

सिंह (Leo) राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो आणि दिलेले पैसेही परत मिळू शकतात. याशिवाय शेअर बाजार आणि लॉटरीशी संबंधित लोकांना नफा मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण, विपणन आणि संगीताशी निगडित लोकांसाठीही वेळ अनुकूल राहणार आहे आणि करिअरमध्ये वाढ होऊ शकते. राजकारणाशी संबंधित लोकांसाठीही काळ यशस्वी ठरु शकतो.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे  ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)

 





Read More