PHOTOS

जिंकलस पोरी! रतन टाटांची ₹7000 ची ऑफर नाकारत पाणी विकून 'तिनं' वर्षभरात कमवले ₹2300 कोटी

Business News : कोण आहे ही मुलगी? भारतीय व्यवसाय क्षेत्रात नवी उंची गाठणारी ही मुलगी आहे तरी कोण? तिनं का नाकारलेली रतन टाटा यांची ऑफर?

 

Advertisement
1/7
व्यवसाय क्षेत्र
व्यवसाय क्षेत्र

Business News : 2022 या वर्षात डोकावून पाहिलं तर व्यवसाय क्षेत्रातली एक मोठी घडामोड समोर येते. कारण, त्यावर्षी मागील 55 वर्षांपासून बाटलीबंद पाण्याच्या उद्योगामध्ये अग्रगणी असणाऱ्या बिस्लेरी कंपनीचे मालक रमेश चौहान यांनी हा संपूर्ण व्यवसाय कोणा दुसऱ्याच्या अधीन देण्याची अर्थात तो विकण्याची घोषणा केली. 

 

2/7
एकुलती एक मुलगी
एकुलती एक मुलगी

वाढत्या वयामुळे आपल्याला ही जाबाबदारी पार पाडता येत नसून, एकुलती एक मुलगी जयंती चौहान या व्यवसायामध्ये रस दाखवत नसल्यामुळं हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं ते म्हणाले होते. बिस्लेरी कंपनीला खरेदी करण्यासाठी पेप्सी, टाटा यांसारख्या कंपन्या पुढे आल्या. बिस्लेरीकडे देशभरात 122 प्लांट, 4500 हून जास्त वितरक असून, रतन टाटा यांनी या कंपनीसाठी 7000 कोटी रुपये मोजण्याची तयारी दाखवली होती. पण, जयंतीनं ही ऑफर नाकारली. 

 

3/7
वडिलांचं वाढतं...
वडिलांचं वाढतं...

वडिलांचं वाढतं वय आणि त्यांची हतबलता पाहून जयंतीची पावलं व्यवसाय़ाकडे वळली. जी मुलगी आजपर्यंत बिस्लेरीपासून दूर राहिली तिनं हा कारभार पूर्णपणे शिताफीनं हाताळला त्याच्या कक्षा रुंदावल्या. बिस्लेरी विकायची नाहीये... असं तिनं सर्व व्यावसायिकांना ठणकावून सांगितलं. 

 

4/7
व्यवसायाची धुरा
 व्यवसायाची धुरा

इथं जयंतीनं व्यवसायाची धुरा सांभाळली तिथं त्या व्यवहारातून टाटांची एक्झिट झाली. वडिलांची जबाबदारी घेत तिनं बिस्लेरीचा कायापालट केला. 2022-23 मध्ये बिस्लेरीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण 2300 रुपयांची निव्वळ नफ्याची कमाई केली. फॅशन आणि फोटोग्राफीकडे कल असणाऱ्या जयंतीनं बेवरेज सेगमेंटमध्ये टाटा आणि अंबानींना टक्कर दिली. 

 

5/7
बाटलीबंद पाणी
बाटलीबंद पाणी

बाटलीबंद पाण्यासमवेत तिनं कार्बोनेटेड ड्रींक्स क्षेत्रातही उडी घेतली. सब ब्रँड रेव, पॉप आणि स्पायसी जीराची सुरुवात केली. बिस्लेरीनं ही नवी उत्पादनं सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला. खुद्द जयंतीनं इथं आपल्या कौशल्याचा वापर करत मार्केटिंग कॅम्पेनची जबाबदारी सांभाळली. 

 

6/7
शिक्षण
शिक्षण

दिल्लीमध्ये जन्मलेल्या जयंतीचं 10 वी पर्यंतचं शिक्षण मुंबईत झालं. यानंतर तिनं लॉस एंजेलिस इन्स्टीट्यूट ऑफ डिझाईन अँड मार्केटिंगमधून पदवी शिक्षण गेतलं. लंडन कॉलेज ऑफ फॅशममधून शिक्षण पूर्ण केलं. पण, वयाच्या 24 व्या वर्षानंतर तिनं व्यवसायातही डोकावणं सुरू केलं. 

 

7/7
नेतृत्त्वं
नेतृत्त्वं

बिस्लेरीच्या मार्केटींग टीमचं नेतृत्त्वं करणारी जयंती दिल्ली, मुंबईत आपली जबाबदारी पार पाडते. कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात तिनं मोलाची भूमिका बजावली आणि हे काम अविरत सुरू ठेवलं.   

 





Read More