दहावीनंतर डिग्री करायची की डिप्लोमा? यामध्ये विद्यार्थी गोंधळलेले असतात. तुम्हीदेखील एक विद्यार्थी आहात आणि काय निवड करायची यात गोंधळला असाल तर तुमच्याकडे काय पर्याय आहेत? हे समजून घेऊया.
Career After 10th: दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आपल्या करिअरच्या वाटा शोधू लागतील. काहीजण आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सारख्या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतील तर काहीजण व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे जातील. दहावीनंतर डिग्री करायची की डिप्लोमा? यामध्ये विद्यार्थी गोंधळलेले असतात. तुम्हीदेखील एक विद्यार्थी आहात आणि काय निवड करायची यात गोंधळला असाल तर तुमच्याकडे काय पर्याय आहेत? हे समजून घेऊया.
दहावीनंतर करिअर शोधताना सर्वात आधी तुमची आवड ओळखा. यावर तुमच्या शिक्षकांसोबत बोला. आर्ट्स, सायन्स, कॉमर्सपैकी कोणत्या स्ट्रिमची आवड असेल तर त्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्य्यांसोबत बोला. तुम्ही अकरावी आणि बारावीसाठी विज्ञान स्ट्रिम निवडत असाल तर पुढे जाऊन तुम्ही इंजिनीअरिंग, मेडिसिन आणि वैज्ञानिक क्षेत्रात जाऊ शकता.
जर तुम्हाला बिझनेस आणि फायनान्स क्षेत्रात जायचं असेल तर अकरावी, बारावीमध्ये कॉमर्स स्ट्रिम निवडू शकता. यातून तुम्ही अकाऊंट्स, इकोनॉमिक्स आणि बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन शिकू शकतात.
तुम्हाला कला क्षेत्राची आवड असेल, सायकोलॉजी आणि सोशल सायन्समध्ये करिअर करायचे असेल तर आर्ट्समध्ये प्रवेश घेऊ शकता. यामध्ये तुम्ही इतिहास, पॉलिटिकल सायन्स आणि सायकोलॉजी सारख्या विषयात पुढे जाऊ शकता.
दहावीनंतर तुम्ही विविध डिप्लोमा कोर्सेसलादेखील प्रवेश घेऊ शकता. यामध्ये तुमच्याकडे इंजिनीअरिंग क्षेत्रात इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, मॅकेनिकल इंजिनीअरिंग, सिव्हिल इंजिनीअरिंग असे पर्याय असतात.
दहावीनंतर पॅरामेडिकलमध्ये नर्सिंग, फार्मसी, लॅब टेक्नोलॉजी असे कोर्स करु शकता. कॉम्प्युटरची आवड असेल तर डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स, डिप्लोमा इन इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी असे डिप्लोमा करु शकता.
डिझायनिंगमध्ये करिअर करायचे असेल तर दहावीनंतर तयारी लागा. यासाठी तुम्हाला डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग, डिप्लोमा इन टेक्सटाइन डिझायनिंग असे पर्याय निवडू शकता.
दहावीनंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ शकता. आयटीआयमध्ये तुम्हाला विविध तांत्रिक कौशल्य शिकवली जातील. ज्यामुळे तुम्हाला विविध उद्योगांमध्ये रोजगार मिळवून देण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त दहावीनंतर पॉलिटेक्निकदेखील करु शकता.
भविष्यात तुमच्यासाठी कोणती स्ट्रीम बेस्ट असेल हे निवडता येत नसेल तर करिअर काऊन्सिलरची मदत घेऊ शकता. ते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार विषयांबद्दल विचारतील. याद्वारे ते तुम्हाला करिअर मार्गदर्शन करतील.
तुम्हाला दहावीमध्ये 90 टक्के मिळालेयत तर तुम्हाला सायन्स फिल्डमध्ये सहज प्रवेश मिळेल. पण आर्ट्स ही तुमची आवड असेल तर तिथेही प्रवेश घेऊ शकता. कॉमर्स, आर्ट्स की सायन्स यामध्ये तुमच्यासाठी काय बेस्ट आहे? हे तुम्ही स्वत:चे परिक्षण करुन जास्त ओळखू शकता.