PHOTOS

10वी नंतर डिप्लोमासाठी 5 पर्याय, तुमचे करिअर पळेल सुसाट

आपण अशा 5 डिप्लोमा कोर्सेसबद्दल जाणून घेऊया. जे पूर्ण केल्यास तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकता आणि मोठी कमाई देखील करू शकता. या अभ्यासक्रमांबद्दल जाणून घेऊया.  

Advertisement
1/10
10वी नंतर डिप्लोमासाठी 5 पर्याय, तुमचे करिअर पळेल सुसाट
10वी नंतर डिप्लोमासाठी 5 पर्याय, तुमचे करिअर पळेल सुसाट

सध्या बोर्डाच्या निकालाचा हंगाम सुरू आहे. अनेक राज्यांच्या बोर्डांनी निकाल जाहीर केले आहेत, तर अनेक राज्यांच्या बोर्ड परीक्षांचे निकाल येणे बाकी आहे. 

2/10
करिअरच्या पुढील वाटा
करिअरच्या पुढील वाटा

बारावीच्या निकालानंतर आता पुढच्या काही दिवसात दहावी परीक्षांचे निकाल जाहीर केले जातील. दहावी उत्तीर्ण अनेक विद्यार्थी करिअरच्या पुढील वाटा शोधतील.  

3/10
कोणता डिप्लोमा अभ्यासक्रम निवडायचा?
कोणता डिप्लोमा अभ्यासक्रम निवडायचा?

काही विद्यार्थी दहावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्राधान्य देतात. अशावेळी कोणता डिप्लोमा अभ्यासक्रम निवडायचा हे अनेकांना माहिती नसते.  

4/10
व्यावसायिक जीवनात पाऊल
व्यावसायिक जीवनात पाऊल

तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी दहावी उत्तीर्ण असेल तर त्यांना व्यावसायिक जीवनात पाऊल टाकण्यास तुम्ही मदत करु शकता. यामुळे ते  स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि तुम्हाला नक्कीच धन्यवाद देतील. 

5/10
5 डिप्लोमा कोर्सेस
 5 डिप्लोमा कोर्सेस

आपण अशा 5 डिप्लोमा कोर्सेसबद्दल जाणून घेऊया. जे पूर्ण केल्यास तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकता आणि मोठी कमाई देखील करू शकता. या अभ्यासक्रमांबद्दल जाणून घेऊया.  

6/10
इंजिनीअरिंग डिप्लोमा:
इंजिनीअरिंग डिप्लोमा:

इंजिनीअरिंग क्षेत्रात स्वारस्य असलेले विद्यार्थी पॉलिटेक्निकच्या माध्यमातून स्वत:साठी चांगले करिअर करू शकतात. पॉलिटेक्निक केल्यानंतर खासगी क्षेत्रात चांगली नोकरी मिळेल. त्यासोबतच तुम्ही नाही सरकारी नोकरीतही नशिब आजमावू शकता. 

7/10
डिजिटल मार्केटिंग मध्ये डिप्लोमा
डिजिटल मार्केटिंग मध्ये डिप्लोमा

सध्या डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात प्रचंड मागणी दिसून येत आहे. मोबाईल, इंटरनेट, तंत्रज्ञान वेगाने वाढत असल्याने भविष्यातही डिजिटल मार्केटिंगची मागणी कमी होणार नाही. तशीच राहण्याची अपेक्षा आहे. डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्राकडे तुम्ही करिअरचा उत्तम पर्याय म्हणून पाहू शकता. 

8/10
डिप्लोमा इन फार्मसी:
डिप्लोमा इन फार्मसी:

दहावीनंतर विद्यार्थी फार्मास्युटिकल क्षेत्रातही करिअर करू शकतात. या कोर्समध्ये तुम्ही औषध स्ट्रक्चर, फार्मसी लॉचा अभ्यास करु शकता. हा कोर्स 2 वर्षांचा असतो. यातून चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. 

9/10
वेब डोव्हलपर:
वेब डोव्हलपर:

आजच्या युगात वेब डेव्हलपर हा देखील एक चांगला करिअर पर्याय आहे. वेब डेव्हलपर फंक्शनल, यूजरवा हवी तशी वेबसाइट आणि वेब ॲप्लिकेशन्स तयार करतात. ते कोडींग करतात. नवीन अॅप्लीकेशन तयार करतात. तसेच त्यांची चाचणी करतात. ते तुमच्या वतीने वेबसाइटवर लक्ष ठेवतात. त्यावर येणारे ट्रॅफीक पाहतात. हा डिप्लोमा कोर्स 1 वर्षांचा असतो.

10/10
डिप्लोमा इन अॅग्रीकल्चर सायन्स
डिप्लोमा इन अॅग्रीकल्चर सायन्स

कृषी विषयात रस असलेले विद्यार्थी कृषी पदविका अभ्यासक्रम करू शकतात. यात तुम्ही नवनवे प्रयोग करु शकता. शेतीचे उत्पन्न वाढायला मदत होईल. 





Read More