PHOTOS

आपण आयुष्यभर कमवत नाही तेवढा पैसा हे सेलेब्स एका Insta Post मधून कमवतात; आकडेवारी पाहाच

Celebs Fees For Sponsored Social Media And Instagram Post: मनोरंजन सृष्टीमधील अनेक कलाकार केवळ अभिनयामधून नाही तर त्यांच्या नावाला असलेल्या किंमतीमुळेही कोट्यवधी रुपये कमवतात. अगदी सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यंत आणि अमिताभपासून ते रणवीरपर्यंत अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टमधून इतके पैसे कमवतात की तितके कमवायला सर्वसमान्यांचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. जाणून घेऊयात अशाच काही सेलिब्रिटींबद्दल आणि त्यांच्या पर पोस्ट चार्जेसबद्दल...

Advertisement
1/11

बॉलिवूड आणि बॉलिवूड स्टार्सची श्रीमंतही हा सर्वसामान्यांमध्ये कायमच चर्चेचा विषय असतो. अनेकदा या स्टार्सकडून आकराल्या जाणाऱ्या मानधनाचा आकडा पाहून सर्वसमान्यांना नक्कीच आश्चर्याचा धक्का बसतो. मात्र सर्वसामान्यांचं संपूर्ण आयुष्य जेवढा पैसा कमवायला निघून जातं तितके पैसे हे सेलिब्रिटी एका सोशल मीडिया पोस्टसाठी घेतात असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. हे सेलिब्रिटी कोणते आणि ते प्रत्येक पोस्टसाठी किती पैसे घेतात पाहूयात...

2/11

बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरुख खान हा सोशल मीडियामधून कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानी आहे.

3/11

शाहरुख खान सोशल मीडियावर एक स्पॉन्सर्ड पोस्ट करण्यासाठी 1 कोटी रुपयांपर्यंत मानधन घेतो.

4/11

तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये रणवीर सिंहचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. त्याचीही ब्रॅण्ड व्हॅल्यू फार जास्त आहे.

5/11

सोशल मीडियावर एक स्पॉन्सर्ड पोस्टसाठी रणवीर सिंह 1 कोटींचं मानधन घेतो.

6/11

सोशल मीडियावर सतत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असणारा आणि उत्तम फॅन फॉलोइंग असलेला अभिनेता म्हणजे अक्षय कुमार.

7/11

साडेसहा कोटींहून अधिक फॉलोअर्स असलेला अक्षय सोशल मीडियावर एक पेड पोस्ट करण्यासाठी 1 कोटींचं मानधन स्वीकारतो.

8/11

सलमान खानचीही ब्रॅण्ड व्हॅल्यू प्रचंड आहे. तो अनेक कंपन्यांच्या जाहिराती करतो.

9/11

सलमान खान सोशल मीडियावर कोणत्याही कंपनीसाठी स्पॉन्सर्ड पोस्ट करण्यासाठी 50 लाख रुपयांपर्यंत मानधन घेतो.

10/11

सोशल मीडियावरील सर्वाधिक विश्वसार्हता असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत पहिल्या स्थानी अमिताभ बच्चन आहे.

11/11

इन्स्ताग्रामवर अमिताभचे 34 मिलियन फॉलोअर्स आहेत. इन्स्ताग्रामवर एक स्पॉनसर्ड पोस्ट करण्यासाठी 50 लाख रुपये आकारतात.





Read More