Champions Trophy 2025 Pakistani Actress Insta Story: पाकिस्तानमधील सर्वात सुंदर अभिनेत्रीमध्ये या महिलेचा समावेश होतो. तिने विराटबद्दल नेमकं काय म्हटलंय पाहूयात...
पाकिस्तानमधील ही अभिनेत्री सध्या भारतीय चाहत्यांमध्ये तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे चर्चेत आहे. नेमकं तिच्या इन्स्टा स्टोरीत आहे काय पाहूयात...
भारत आणि पाकिस्तानमधील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सामन्यामध्ये भारताने सहा गडी राखून विजय मिळवला.
भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला स्टार फलंदाज विराट कोहली. विराट कोहलीने भारतीय संघाचा विजय आणि स्वत:चं शतक असा दुहेरी योग जुळवून आणत भारतीय चाहत्यांना सेलिब्रेशनची दोन कारण दिली.
विराटने 111 चेंडूमध्ये झळकावलेलं शतक आणि दुसरीकडे पाकिस्तानी संघाचा सुमार खेळ यामुळे अनेक पाकिस्तानी चाहतेही सामना संपण्यापूर्वी विराटच्या शतकासाठी प्रार्थना करताना दिसले. विराटची पाठराखण करणाऱ्या पाकिस्तान्यांमध्ये एका पाकिस्तानी अभिनेत्रीचाही समावेश आहे.
विराटनेही क्रिकेट चाहत्यांची निराशा न करता अगदी शेवटच्या बॉलवर चौकार लगावत आपलं एकदिवसीय क्रिकेटमधील 51 व शतक झळकावलं.
पाकिस्तानविरुद्धच्या विराटच्या चौथ्या शतकामुळे भारताने सहज विजय मिळवल्यानंतर देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी जल्लोष करण्यात आला.
मात्र केवळ भारतीय नाही तर पाकिस्तानी चाहतेही विराटच्या प्रेमात दिसले. विशेष म्हणजे विराटचं कौतुक करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानमधील सर्वात मादक अभिनेत्रीपैकी एकीचा समावेश आहे.
या पाकिस्तानी अभिनेत्रीने टीव्हीवर सामना पाहता काढलेला विराटचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ठेवला आहे. तिने विराटचं कौतुकही केलं आहे.
ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलतोय तिचं नाव आहे, माया अली!
मायाने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये विराटचा फोटो ठेवताना, "त्याच्याबद्दल फार आदर वाटतोय. त्याला उगाच नाही किंग म्हणत," अशा ओळी लिहित विराट कोहली असा हॅशटॅग वापरला आहे.
मायाची ही इन्स्टाग्राम स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरत असून अनेकांनी या स्टोरीचा स्क्रीनशॉट व्हायरल केला आहे.
माया अली ही 35 वर्षांची असून तिचा जन्म 27 जुलै 1989 रोजी झाला आहे. अनेक ऊर्दू चित्रपट आणि मालिकांमध्ये मायाने काम केलं असून तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
माया ही पाकिस्तानी मनोरंजनसृष्टीमधील सर्वात सुंदर आणि मादक अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिने विराटचा फोटो इन्स्टा स्टोरीला ठेवल्याने भारतीय चाहत्यांमध्येही ती चर्चेत आहे.