Mayanti Langer Net Worth Bio Income: सामन्यांआधी दिसणाऱ्या या अँकरचा चेहरा अनेकांच्या परिचयाचा आहे. मात्र ती अँकरींगसाठी किती पगार घेते तुम्हाला ठाऊक आहे का? तसेच तिचे सासरे हे सुद्धा क्रिकेटमधील मोठं नाव आहे. तिची कमाई किती आणि तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेऊयात...
मयंती ही तिच्या क्रिकेटर पतीपेक्षा अधिक लोकप्रिय आहे. तिची लव्ह स्टोरीही फार हटके आहे. मयंती किती पगार घेत आणि तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेऊयात...
भारत आणि पाकिस्तानदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा सामाना आज खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी तज्ज्ञांशी गप्पा मारताना अनेक प्रेझेंटर्स दिसतात. त्यामध्ये भारताच्या मयंती लँगरचाही समावेश आहे.
क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या समालोचकांपैकी एक चेहरा म्हणजे मयंती लँगर.
2020 ते 2022 या दोन वर्ष क्रिकेटच्या समालोचनापासून दूर असलेल्या मयंतीने पुनरागमान केलं. सध्या मयंती चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी स्टार स्पोर्ट्सकडून समालोचन करताना दिसतेय.
मयंती ही मागील अनेक वर्षांपासून स्टार स्पोर्ट्सच्या सर्वोत्तम समालोचकांपैकी एक आहे. तिने तिच्या करिअरच्या सर्वोच्च स्तरावर असताना स्टुअर्ट बिन्नीबरोबर 2012 साली लग्न केलं. खरं तर लग्नाच्या पाच वर्ष आधीपासूनच ती अँकरींग करत होती.
2007 मध्ये प्रोफेश्नल अँकर म्हणून क्रिकेटच्या मैदानात उतरलेल्या मयंतीने अल्पवाधीत मोठी लोकप्रियता मिळवली. यामध्ये आयपीएल, आयसीसी एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्ड कप सारख्या प्रमुख स्पर्धांचा समावेश आहे.
मयंतीने स्टार स्पोर्ट्सआधी ईएसपीएन आणि झी स्पोर्ट्ससाठी काम केलं आहे. तिने व्हिवो इंडिया, एअरटेल इंडिया यासारख्या अनेक कंपन्यांबरोबरही काम केलं आहे.
केवळ क्रिकेटच नाही तर मयंतीने 2010 साली फिफा फुटबॉल वर्ल्डकपही होस्ट केला होता. ती अशाप्रकारे फिफासाठी काम करणारी पहिली भारतीय महिला अँकर ठरली होती.
आयपीएलदरम्यान मयंती आणि स्टुअर्ट बिन्नीची पहिल्यांदा भेट झाली. तिथेच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघे अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी 2012 साली लग्न केलं. सप्टेंबर 2020 मध्ये मयंतीला पुत्ररत्नप्राप्ती झाली. त्यामुळेच ती अँकरींगपासून दोन वर्ष दूर राहिली.
मयंतीचे सासरे रॉजर बिन्नी हे हे सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत.
मयंतीला स्टार स्पोर्ट्सकडून वर्षाला 20 ते 30 लाख रुपये पगार म्हणून मिळतो असं सांगितलं जातं. मात्र याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. म्हणजेच महिन्याला अडीच ते पावणे तीन लाखांच्या दरम्यान मयंतीला पगार मिळतो.
मूळची दिल्लीकर असलेल्या मयंतीची एकूण संपत्ती 83 कोटी रुपये इतकी आहे. मयंती ही तिच्या पतीपेक्षा अधिक लोकप्रिय आहे.