चाणक्य यांच्या मते, आयुष्यात कधीकधी अशा परिस्थिती उद्भवतात जिथे आपण चुकूनही तोंड उघडू नये.
Chanakya Niti:आचार्य चाणक्य हे भारतातील महान तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकीय सल्लागार आणि शिक्षक होते. त्यांना कौटिल्य किंवा विष्णुगुप्त असेही संबोधले जाते.
ते मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचे प्रमुख सल्लागार होते आणि त्यांनी मौर्य साम्राज्याच्या उभारणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचे तत्त्वज्ञान आणि विचारधारा आजही राजकारण, अर्थशास्त्र, नेतृत्व आणि जीवन व्यवस्थापनात प्रासंगिक मानली जाते.
चाणक्य यांनी जीवनात यश आणि आनंदाचे अनेक सूत्र सांगितले आहेत. त्यांचे शब्द चाणक्य नीतिमध्ये नोंदवले आहेत. चाणक्य यांनी सांगितले आहे की कोणत्या परिस्थितीत गप्प राहणे आपल्यासाठी चांगले आहे. चाणक्य यांच्या मते, आयुष्यात कधीकधी अशा परिस्थिती उद्भवतात जिथे आपण चुकूनही तोंड उघडू नये.
5 परिस्थितीत बोलणे तुम्हाला अनेक संकटात टाकू शकते. यापैकी पहिली म्हणजे दुसऱ्याच्या भांडणात तुम्ही कधीही तोंड उघडू नये. याने भांडणात तुम्ही गुंतले जाऊ शकता.
तुमच्या भावनांचा आदर करत नसलेल्या व्यक्तीसमोर कधीही तोंड उघडू नका. याने काहीच फायदा होणार नाही.
जर तुम्हाला कोणत्याही विषयावर पूर्ण माहिती नसेल, तर तुम्ही चुकूनही तोंड उघडू नये. अशाने तुमची फजिती होऊ शकते.
जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तेव्हा तुम्ही नेहमीच तुमचे तोंड बंद ठेवावे. असा प्रसंग घर, ऑफीस असा कुठेही येऊ शकतो.
जेव्हा कोणी तुमच्यासमोर स्वतःची प्रशंसा करत असेल तेव्हा तुम्ही त्या वेळी पूर्णपणे शांत राहावे. अशावेळी तुमच्या तोंडून काहीतरी वेगळ बाहेर पडण्याची शक्यता असते.