PHOTOS

Chandra Grahan 2023 : कधी आहे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण? 'या' राशीचं भाग्य चंद्रसारखं चमकणार, तर यांच्यावर कोसळणार संकट

Chandra Grahan 2023 Date : सर्वसामान्य लोक आणि ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहण हे चांगल मानलं जातं नाही. ग्रहण काळात अनेक लोक घराबाहेर पडतं नाहीत. तर गर्भवती महिल्यांवर अनेक बंधन लादली जातात. त्यामुळे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण (Chandra Grahan 2023) आहे. यामुळे राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या...  

Advertisement
1/7
कधी आहे चंद्रग्रहण आणि वेळ? (Chandra Grahan 2023 in india date and time)
कधी आहे चंद्रग्रहण आणि वेळ? (Chandra Grahan 2023 in india date and time)

चंद्रग्रहण 5 मे 2023 शुक्रवारी म्हणजे बुद्ध पौर्णिमेला आहे. चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार 08:44 पासून सुरू होणार ते शनिवार 06 मे 2023 ला मध्यरात्री 01:01 पर्यंत असणार आहे.

2/7
धनु (Sagittarius Zodiac)
धनु (Sagittarius Zodiac)

वर्षातील पहिलं चंद्रग्रहण या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. व्यवसाय आणि नवीन कामात यश मिळणार आहे. अचानक आर्थिक फायदा होणार असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

3/7
कन्या (Virgo Zodiac)
कन्या (Virgo Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण नवीन नोकरीची संधी घेऊन येणार आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होणार असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर कुठला वाद सुरु असेल तर तो मिटले, असं भाकित करण्यात आलं आहे. 

4/7
सिंह (Leo Zodiac)
सिंह (Leo Zodiac)

या राशीसाठी चंद्रग्रहण करिअर आणि व्यवसायात भाग्यशाली ठरणार आहे. परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. वडीलधारांशी सुसंवाद वाढेल. आर्थिक स्थिती बळकट होणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

5/7
कर्क (Cancer Zodiac)
कर्क (Cancer Zodiac)

तर चंद्रग्रहण या राशीसाठी त्रासदायक ठरणार आहे. या लोकांनी तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. मानसिकदृष्ट्या तणावपूर्ण वातावरण राहू शकतं. कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. 

6/7
वृषभ (Taurus Zodiac)
वृषभ (Taurus Zodiac)

या राशीच्या लोकांनी चंद्रग्रहण काळात नातेसंबंधात काळजी घ्यावी. भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीवरून घरात वाद होऊ शकतात. 

7/7
मेष (Aries Zodiac)
मेष (Aries Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण आर्थिक संकट घेऊन येणार आहे. कुठल्याही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या अन्यथा तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. कायदेशीर वादातही अडकण्याची भीती आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)





Read More