Chandra Grahan 2025 : या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे होळी या सणाच्या दिवशी असणार आहे. हे चंद्रग्रहण काही राशींच्या लोकांसाठी चांगल नसणार आहे. त्या लोकांना सावध राहावं लागणार आहे.
या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे होळीच्या दिवशी 14 मार्च 2025 ला असणार आहे. होळीच्या दिवशी सकाळी 10.39 वाजेपासून दुपारी 2.18 वाजेपर्यंत असणार आहे.
चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे सुतक काळ नसणार आहे. पण या चंद्रग्रहणाचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. पण काही राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण घातक असणार आहे.
सिंह राशीच्या लोकांनी कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे. आर्थिक ताण वाढू शकतो. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही जे काम करण्याचा विचार करत आहात त्यात अडथळे येऊ शकतात. मन अशांत राहील.
होळीच्या दिवशी होणारे चंद्रग्रहण तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ मानले जात नाही. तुमचे खर्च प्रचंड वाढू शकतात.
तूळ राशीच्या लोकांनी त्यांच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नये. तुमच्या मेहनतीच्या तुलनेत तुम्हाला अपेक्षित यश मिळणार नाही, यामुळे तुमचे मन अस्वस्थ राहील. तुमचा राग नियंत्रित करा. घाईघाईत कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका.
वर्षातील पहिले चंद्रग्रहण मिथुन राशीच्या लोकांच्या आनंदावर विरजन पडणार आहे. काहीही बोलण्यापूर्वी दोनदा विचार करा, गोष्टी बिघडू शकतात. कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. अन्यथा तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)