Water on Moon: आता म्हणजे सर्वाधित चर्चेत असणारा विषय म्हणजेच चंद्रावर पाणी आहे की नाही याबाबतचं गुपितही समोर आलं आहे. यावेळी एका लहानशा उपकरणानं यासाठी मोठी मदत केली आहे.
Water on Moon: भारतीय शास्त्रज्ञ गेल्या बऱ्याच काळापासून चांद्रयान 1 मोहिमेशी संबंधित रिमोट सेंसिंग डेटावर काम करत असून, आता त्यांनी एक लक्षवेधी खुलासा केला आहे. संशोधकांच्या माहितीनुसार पृथ्वीवरील हाय एनर्जी इलेक्ट्रॉनमुळं चंद्रावरही पाण्याची निर्मिती होत असावी.
अमेरिकेतील हावाई विद्यापीठातील संशोधकांनी निरीक्षण करत पृथ्वीच्या प्लाझ्मा कवरमध्ये असणारे इलेक्ट्रॉन चंद्रावरही पाण्याची निर्मिती करत असल्याचं स्पष्ट केलं. ज्यामुळं चंद्राच्या पृष्ठावर काही अंशी बदल झाल्याचीही बाब समोर आली. ज्यामध्ये पर्वतं आणि खनिजांचं दुभंगणं या आणि त्यासारख्या घटनांचा समावेश आहे.
नेचर अॅस्ट्रोनॉमी मॅगजीनच्या माहितीनुसार पृथ्वीवरील इलेक्ट्रॉनमुळं चंद्रावर पाणी तयार होत असावं. किंबहुना आता पाण्याचे गुणधर्म समजून घेण्याचीही गरज असून, भविष्याच्या दृष्टीनं ही बाब अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.
चांद्रयान 1 नं चंद्रावर पाण्याच्या अस्तित्वासंदर्भातील माहिती मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2008 मध्ये सुरु झालेली ही भारताची पहिलीच चांद्रयान मोहिम होती.
तज्ज्ञांच्या मते जेव्हा चंद्र मॅग्नेटोटलच्या बाहेर जातो तेव्हा त्याच्या पृष्ठावर सौरवायूचा दबाव असतो. मॅग्नेटोटलच्या अंतर्गत भागात कोणताही प्रोटॉन आणि पाण्याची निर्मिती होण्याची चिन्हं नाहीत. हे एक असं क्षेत्र आहे जो चंद्राला सौरवायूपासून सुरक्षित ठेवतो.
चांद्रयान 1 च्या रिमोट सेंसिंग ऑब्जर्वेशन मधून समोर आलेल्या पण्याच्या निर्मितीसंदर्भातील माहितीचे संदर्भ पाहून शास्त्रज्ञही हैराण झाले. आश्चर्याची बाब म्हणजे 2008 मधील ही मोहीम 2009 मध्ये संचालित करण्यात आली आणि त्यातील माहितीची आजही वापर होत आहे.
इस्रोच्या या मोहिमेत एक ऑर्बिटर आणि इम्पॅक्टरचा समावेश होता. आता चांद्रयान 3 या माहितीला दुजोरा मिळेल अशी कोणती माहिती देतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.