PHOTOS

चारोळीचे आरोग्यदायी फायदे, शरीरात होतील सकारात्मक बदल

chironji benefits:चारोळीचा वापर फक्त मिठाई किंवा खीरमध्येच केला जात नाही, तर आरोग्याच्या अनेक समस्यांसाठीही खूप फायदेशीर मानले जाते. प्रोटीनचा खूप चांगला स्रोत असलेले ड्रायफ्रूट आहे.

Advertisement
1/6

शारीरिक अशक्तपणा दूर करण्यासाठी ५ ते १० ग्रॅम चारोळी पावडर करून दुधात साखर मिसळून प्यायल्याने अशक्तपणा दूर होतो आणि शारीरिक वाढीसाठी चारोळी खूप फायदेशीर आहे.रात्री दुधात चमचाभर चारोळी मिसळून प्यायल्याने सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो.तसेच प्रजनन शमता वाढवते. 

 

2/6

तोंड येण्याचा त्रास वारंवार जाणवत असेल तर ३ ते ४ चार दाणे चघळल्यास खूप फायदा होतो.डोकेदुखीतून येणारी चक्कर टाळण्यासाठी चारोळीचे दाणे खूप फायदेशीर आहेत.हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. तसेच शरीरातील हाडे आणि दात यासाठी  फायदेशीर आहे.

3/6

पचनक्रियेतील विषारी घटक काढून टाकण्यात मदत करते. तसेच पोटातील दाह कमी करण्यास मदत करते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तसेच घामोळ्यांपासून सुटका मिळते. चारोळीच्या तेलाने मालिश केल्याने सुज कमी होते.मधुमेह नियंत्रणात ठेवते.

 

4/6

स्मरणशक्ती वाढवते, जुन्या जखमा ठिक करते, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ५ ते १० ग्रॅम चारोळी दुधात साखर मिसळून प्यायल्याने खूप फायदा होतो.शरीराला खाज येत असेल तर चारोळीची पावडर खोबरेल तेलात मिक्स करून लावल्याने फायदा होतो.

 

5/6

चारोळीचे असे अनेक फायदे आहेत. पण ते वयोगटानुसार किती खावे असे काही बंधन नाही. ते आपण दिवसभरातून सकाळ, दुपार, रात्री झोपताना दहा बारा दाणे खाल्ले तरी चालतात. ते आयुर्वेदिक असल्यामुळे आपल्या शरीराला काहीही नुकसान होत नाही.चमचाभर चारोळीचा पावडर करून दुधात घेतल्यास जुलाब आणि अतिसारापासून आराम मिळतो. शेळीच्या दुधात चमचाभर चारोळी आणि मध मिसळून प्यायल्याने अतिसारासह रक्तस्त्रावाची समस्या दूर होण्यास मदत होते.

 

6/6

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

 





Read More