Benefits Of Chewing Basil Leaves Daily: तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. घराघरात तुळस पूजली जाते. पण तुळशीचे आरोग्यासाठी फायदेही खूप आहेत.
आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुळशीचे रोप महत्त्वाची भूमिका बजावते. तुळस अनेक आजार पळवून लावते. त्यामुळं घराघरात तुळशीचे झाड हवे, असं म्हटलं जातं. रोज सकाळी तुळस खाल्ल्याने आश्चर्यजनक फायदे मिळतात.
तुळशीची पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. रोज तुळशीची पाने चावून खाल्ल्यास पोटाच्या सर्व समस्या चुटकीसरशी दूर होतात.
तुळशीत औषधीय गुण असतात. रोज तुळशीची पाने चावून खाल्ल्यास शारिरीक आणि मानसिक समस्यांपासून आराम मिळतो. तुळशीच्या पानांमुळं रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळं वारंवार होणाऱ्या सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.
अनेकांना मुखदुर्गंधीचा सामना करावा लागतो. यावर तुळशीचे पाने हा प्रभावी उपाय आहे. तुळशीची पाने तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करतो.
दीर्घकाळ शारीरिक समस्यांनी झगडणाऱ्या लोकांनी तुळशीची पाने खाल्लास मानसिक समस्यांपासूनही सुटका होते. तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी रोज तुळशीच्या पानांचे सेवन करावे.
शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रोज तुळीशीची चार ते पाच पाने चावून खा. रोज रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन करणे खूप चांगले असते. यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटीबायोटिक गुणधर्म आढळतात, जे शरीरासाठी फायदेशीर मानले जातात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)