ांचा 'छावा' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने 202...
विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. हा चित्रपट 2025 चा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.
'छावा' चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने 2025 मधील सर्व चित्रपटांचा कमाईमध्ये रेकॉर्ड मोडला आहे.
'छावा' चित्रपटाला प्रदर्शित होऊन 11 दिवस उलटले आहेत. चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात प्रचंड कमाई केली आहे. या चित्रपटाने 11 व्या दिवशी किती कमाई केली जाणून घेऊयात सविस्तर.
सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'छावा' चित्रपटाने 11 व्या दिवशी 18.50 कोटींची कमाई केलीय. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 345.25 कोटींची कमाई केली आहे.
या चित्रपटाने भारतात पहिल्याच आठवड्यात 219.25 कोटींची कमाई केली. लवकरच हा चित्रपट 400 कोटींचा आकडा पार करेल अशी शक्यता आहे.
ट्रेड एनालिस्टने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर केलीय. ज्यामध्ये अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटानंतर 'छावा' दुसरा हिंदी चित्रपट ठरला आहे.
ज्याने दुसऱ्या आठवड्यात देखील 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय. गेल्या वर्षी अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात 128 कोटींची कमाई केली. तर 'छावा' चित्रपटाने 109.23 कोटींची कमाई केली.