PHOTOS

... जेव्हा राष्ट्रवादीचा 'हा' दिग्गज नेता दुबईचे शेख म्हणून बेळगावात शिरला होता, Photo पाहून तुम्हीही ओळखणार नाही

कर्नाटक सरकारचे बेळगाव मध्ये हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतोय या पार्श्वभूमीवर विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव मध्ये महामेळावाचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement
1/7
... जेव्हा राष्ट्रवादीचा 'हा' दिग्गज नेता दुबईचे शेख म्हणून बेळगावात शिरला होता, Photo पाहून तुम्हीही ओळखणार नाही
... जेव्हा राष्ट्रवादीचा 'हा' दिग्गज नेता दुबईचे शेख म्हणून बेळगावात शिरला होता, Photo पाहून तुम्हीही ओळखणार नाही

कर्नाटक सरकारचे बेळगाव मध्ये हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतोय या पार्श्वभूमीवर विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव मध्ये महामेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळं वातावरण तापलं आहे. 

2/7

सोमवार सकाळपासूनच या परिस्थितीला गंभीर वळण मिळालं आहे. सीमावादाचा हा मुद्दा पुन्हा उफाळून आल्यानंतर आमदार छगन भुजबळ यांचा एक किस्सा चर्चेत आला आहे. 

3/7

 1986 साली तत्कालीन सरकारने बेळगावसह संपूर्ण सीमाभागात कन्नड सक्ती लागू केली. या सक्तीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. यात महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनीही सहभाग घेतला. तेव्हा छगन भुजबळ यांनी आंदोलनात भाग घेण्यासाठी चक्क वेषांतर केले होते. तेव्हा भुजबळ शिवसेनेत होते.

4/7

वेषांतर करुन ते बेळगावात दाखल झाले होते. महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात येऊ नये यासाठी कर्नाटकच्या पोलिसांनी नाकेबंदी केली होती. मात्र तेव्हा महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी वेषांतर करुन कर्नाटकात दाखल झाले होते. 

5/7

छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर हा अनुभव एकदा मांडला होता. ते म्हणतात 'कानडी सक्तीच्या विरोधात आणि बेळगांव-कारवार सीमाप्रश्नी दि.४ जून १९८६ रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशाने वेशभूषा करून बेळगावात आंदोलन केले होते.'

6/7

कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातुन बेळगावात जाण्याचे मार्ग बंद केल्यानंतर गोवा मार्गे वेशभुषा भुजबळ बेळगावात दाखल झाले होते. तेव्हा त्यांनी दुबईचे व्यापारी इक्बाल शेख यांची वेशभूषा केली होती. 

7/7

बेळगावात दाखल झाल्यानंतर त्यांनी आंदोलनेदेखील केली. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. तेव्हा धारवाडच्या तुरूंगात दोन महिने काढल्यानंतर त्यांची सुटका झाली. 





Read More