भारतीय नागरिक असलेल्या 18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये पालक मुलांच्या नावावर गुंतवणूक करू शकतात.
Child Investment Plan: पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (PFRDA) ने सप्टेंबर 2024 मध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) सुरु केली. ही योजना मुलांच्या आर्थिक सुरक्षिततेचे उत्कृष्ट साधन बनत आहे.
भारतीय नागरिक असलेल्या 18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये पालक मुलांच्या नावावर गुंतवणूक करू शकतात.
या योजनेचा व्याज दर 9.5% ते 10% च्या दरम्यान आहे. ज्यामुळे मुलांच्या भविष्यासाठी हे एक मजबूत आर्थिक साधन बनते. या योजनेद्वारे पालक केवळ त्यांच्या मुलांसाठी सेवानिवृत्ती निधी तयार करतात. यासोबतच मुलांना बचत करण्याची सवय लावण्यासही मदत करतात.
कोणतेीही भारतीय अल्पवयीन मुले NPS वात्सल्य योजनेत सामील होऊ शकतात. यात मुलांच्या नावाने खाते उघडले जाते, जे पालक चालवतात.
योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलाच्या जन्मतारखेचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड इ.).पालकाचे केवायसी (आधार, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इ.),पालकांचे पॅन कार्ड किंवा फॉर्म,NRI किंवा OCI प्रकरणांमध्ये मुलाचे NRE/NRO बँक खाते असावे.
या योजनेत किमान वार्षिक योगदान 1 हजार रुपये इतके आहे. 3 वर्षांनंतर शिक्षण, उपचार किंवा 75% पेक्षा जास्त अपंगत्व, अशा विशेष स्थितीत आंशिक पैसे काढू शकता. जास्तीत जास्त 25% कॉन्ट्रीब्युशन रक्कम (परतावा वगळता) काढता येते.
इक्विटीमध्ये NSE/BSE च्या टॉप 200 कंपन्यांचे शेअर्स, कॉर्पोरेट बाँडमध्ये बाँड आणि डिबेंचर, सरकारी सुरक्षेत सरकार आणि राज्य विकास कर्ज, इतर मालमत्तांमध्ये गुंतवले जातात.
जेव्हा तुमचे मूल 18 वर्षांचे होईल तेव्हाच या योजनेतून बाहेर पडण्याची मुभा असते. यात 80% रकमेतून अॅन्यूटी खरेदी केली जाईल. 20% एकरकमी म्हणून काढता येईल. ही योजना मुलांना आर्थिक शिस्त शिकवण्याची आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याची अनोखी संधी आहे.