Symptoms of Depression : हल्लीच्या लहान मुलांमध्ये चिडचिड, राग येणे या गोष्टी सहज दिसून येतात. या स्वभावामुळे अनेक मुलं डिप्रेशनमध्येही जातात. पण नेमकं हे डिप्रेशनमध्ये आहे तरी काय?
आजकालची लहान मुलं छोट्या छोट्या गोष्टीवरुन चिडचिड करतात. तसेच आई-बाबा ओरडले तरी जराही सहन करत नाही. त्यांचा हाच स्वभाव त्यांना डिप्रेशन मध्ये घेऊन जातो.
मनाला न पटणारी किंवा आवडणारी घटना घडल्यास मन साहजिकच नाराज होते. जसे की, अपयश आल्याने डिप्रेशन येते. अशावेळी पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
जर तुमची मुलं प्रत्येक गोष्टीवरून चिडचिड करत असतीलतर हे पालकांनी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. कारण मुलांचं असं वर्तन डिप्रेशनमध्ये जाण्याची स्थिती असू शकते.
जर तुमची मुलं बोलकी असतील आणि अचानक शांत शांत राहात असेल तर वेळीच लक्ष द्या. अशावेळी त्याच्याशी कुणी बोलण्याचा, गप्पा मारण्याच प्रयत्न करा.
आपण सर्वचजण पाहतो की मुलं खूप चंचल असतात. एके ठिकाणी बसू शकत नाहीत. पण अचानक मुल शांत होऊन एकटेच राहायला लागत असेल. आई-बाबा किंवा इतर कुणाशीही बोलण्यासाठी इंटरेस्ट दाखवत नसेल.
जर मुलं खोलीत स्वत:शीच बडबड करत असेल तर हे अत्यंत गंभीर आहे. यावरून मुलाचं मानसिक संतुलन चांगलं नसल्याचं समजून जायला हवं.
लवकरच मुलाच्या समुपदेशनाला सुरूवात करून मानसिक आजारातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे.