ICC World Cup Semifinal यंदा वनडे वर्ल्ड कप भारतात खेळवला जाणार आहे. यजमान भारतीय संघाला याचा फायदा मिळणार का?
येत्या 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय वर्ल्ड कपला (World Cup 2023) सुरुवात होणार आहे. या आयसीसी स्पर्धेचे वेळापत्रकही (WC Schedule) जाहीर करण्यात आलं असून आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल याने मोठी भविष्यवाणी केलीये.
भारताकडे सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत आणि त्याला आपल्या मैदानात खेळण्याचा फायदाही मिळेल. भारतीय संघावर विजेतेपदासाठी दबाव असेल, भारतीय संघाने आपल्या भूमीवर विजय मिळवावा अशी भारतातील प्रत्येकाची इच्छा आहे, असं ख्रिस गेल म्हणतो.
कोणते संघ सेमीफायनलपर्यंत पोहोचतील? असा सवाल ख्रिस गेलला विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चार संघ असतील, असं ख्रिस गेल म्हणाला आहे.
केवळ विराटच नाही तर प्रत्येक खेळाडू वाईट काळातून जातो. बलवान खेळाडू जास्त काळ मैदानात टिकतात. विराट मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत आहे. विश्वचषकातही त्याचं वर्चस्व कायम राहणार आहे, असा विश्वास देखील युनिव्हर्सल बॉसने व्यक्त केलाय.
भारतात होणाऱ्या विश्वचषकात वेस्ट इंडिजचा संघ नसेल तर मी खूप निराश होईल. वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी भविष्यात गोष्टी चांगल्या होतील, अशी आशा देखीस ख्रिस गेलने व्यक्त केली आहे.