PHOTOS

"जगण्याची खरी श्रीमंती म्हणजे..." म्हणत शेतात रमले CM शिंदेंचे खासदारपुत्र! भात लावणीचे Photos पाहाच

Shrikant Shinde Worked In Farm: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे सध्या गावपण अनुभवत आहेत. त्यांची सोशल मीडियावरुन काही फारच भावनिक कॅप्शन देत फोटो शेअर केले आहेत. यापैकी काही फोटोंमध्ये श्रींकात शिंदे शेतात राबताना दिसत आहेत तर काही फोटोंमध्ये ते चक्क गोठ्यात दिसत आहेत. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय आणि शेतात काय काय कामं केली ते...

Advertisement
1/17

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदे हे शेतीच्या कामांमध्ये रमल्याचं चित्र नुकतेचं पहायला मिळाले.

 

2/17

श्रीकांत शिंदे यांनीच शेतात कामं करत असल्याचे काही फोटो आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

3/17

यापैकी एका फोटो श्रीकांत शिंदे ट्रॅक्टर चालवताना दिसत आहेत.

4/17

अन्य एका फोटोमध्ये श्रीकांत शिंदे भाताची लागवड करताना दिसत आहेत.

5/17

श्रीकांत शिंदेंनी अगदी गुरांच्या गोठ्यात जाऊनही यावेळी काम केल्याचं पहायला मिळालं.

6/17

श्रीकांत शिंदेंनी गुरांना चारा देण्याचंही कामही केलं. त्यांनीच या गावाकडील अनुभवाचे काही फोटो शेअर केले आहेत.

7/17

"समाधान आणि सुख या शब्दांचा समानार्थी शब्द फक्त गावचे घर हाच असतो. गावच्या शेतीत रमणे आणि गुरावासरांना मायेने जवळ घेणे ही गोकुळश्रीमंती अनुभवताना त्याबद्दल शब्दांत लिहिणे हे कठीण असते," अशी कॅप्शन श्रीकांत शिंदेंनी या फोटोला दिली आहे.

8/17

"शेतीत राबताना त्या बळीराजाच्या कष्टाची जाणीव आपल्या हातात असलेल्या जबाबदारीची जाणीव देते," असं म्हणत श्रीकांत यांनी शेतात भाताची लागवड करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

9/17

"भाताची लावणी करताना तीच जाणीव प्रत्येक रोपात होती," असंही श्रीकांत यांनी म्हटलं आहे.

10/17

"पानापानातुन वाढणारे झाड, भातशेतीत मळ्यात वाढणारी भातरोपं, जिवंत बहरणारा हिरवा डोंगर आणि पावसाचा कणाकणात रुजण्याचा सोहळा हे सगळं पाहणे म्हणजे एक ऊर्जा असते," अशी कॅप्शन या फोटोंना श्रीकांत यांनी दिली आहे.

11/17

"गुरंवासरे त्यांचा मुकेपणा, त्यांची माया हे सगळं अबोल असते पण तरीही ते खूप बोलकं असते," अशा भावना मुख्यमंत्र्यांच्या खासदारपुत्राने व्यक्त केल्या आहेत.

12/17

"हे गावपण अनुभवण्याचा एक वेगळाच आनंद आहे. निसर्गाचं हे देणं जगण्याचा भाग असणं यापेक्षा वेगळं भाग्य नाही," असंही श्रीकांत यांनी म्हटलं आहे. 

13/17

"दिवस वेगाने सरकतात पण अजूनही गावचे घर आठवलं की मग जगण्याची खरी श्रीमंती म्हणजे काय ते समजते," असं म्हणत श्रीकांत यांनी हे फोटो शेअर केले आहेत. 

14/17

काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर दौऱ्यादरम्यान शिवराष्ट्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पन्हाळगड ते विशाळगड - पावनखिंड मार्ग पदयात्रेतही श्रीकांत शिंदे सहभागी झाले.

15/17

शिवरायांचा जयघोष करत रोमांचपूर्ण वातावरणात पावनखिंडीच्या दिशेने आम्ही सारे मार्गस्थ झालो. पन्हाळगडापासून विशाळगडापर्यंतची वाट तशी अत्यंत खडतर. सोबत असलेले शिवभक्त, ‘जय भवानी जय शिवराय’ या घोषणांनी दुमदुमून गेलेला परिसर यामुळे ही खडतर वाट सोपी वाटू लागली, असं श्रीकांत शिंदेंनी सांगितलं.

16/17

चहुबाजूने पसरलेले घनदाट जंगल, त्यात वातावरणाची अधिक शोभा वाढवणारा पाऊस, मध्ये येणाऱ्या मोठाल्या खडकांचे अडसर अशा या ऐतिहासिक पाऊलवाटांचा आम्ही अनुभव घेत पुढे जात होतो, असंही श्रीकांत यांनी या भटकंतीबद्दल बोलताना सांगितलं.

17/17

"या वाटेवर निखळ पाण्याचे स्त्रोत आमची तहान भागवत होते. शिवाजी महाराजांच्या आणि ‘हर हर महादेव’ च्या घोषणांनी जंगल परिसर दुमदुमून गेला होता," असंही श्रीकांत म्हणाले.





Read More