रात्रीच्या जेवणानंतर अनेकदा चपात्या उरतात. दुसऱ्या दिवशी या शिळ्या पोळ्यांचे काय करायचे असा प्रश्न पडतो. कधीकधी घरांत शिळ्या पोळ्यांचा उपमा किंवा पोळीचा लाडू केला जातो. पण मुलंदेखील तेचे तेच पदार्थ खावून कंटाळतात, अशावेळी तुम्ही हे हटके पदार्थ करून बघू शकता.
शिळी उरलेल्या पोळीला एका बाजूला बटर किंवा तूप लावून घ्या. त्यानंतर पोळीच्या एका बाजूला सॉस लावा. त्यानंतर पोळी चार भागात दुमडून एका बाजूला कांदा, काकडी किंवा गाजर ठेवा. नंतर एका बाजूला चीज किंवा एखादी उरलेली भाजी ठेवा आणि पोळी त्रिकोणी भागात रॅप करून तव्यावर चांगली खरपूस भाजून घ्या. तुम्ही हा रॅप सॉस किंवा चटणीसोबत खावू शकता.
शिळ्या चपातीवर बटर आणि सॉस लावून घ्या. त्यानंतर मधोमध एखादी भाजी भरून त्या पोळीचा रोल तयार करा. आता तव्यावर हा रोल चांगला भाजून खा.
उरलेल्या पोळ्यांचे तुकडे करून ते तेलात खरपूस तळून घ्या. त्यानंतर कुरकुरीत पोळीच्या तुकड्यांवर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शेव टाकून तुम्ही भेळसारखी खावू शकता.
शिळ्या पोळीचे रोल करून बारीक कापून घ्यायचे. पॅनमध्ये तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला लसूण घालायचा. त्यानंतर कोबी, शिमला मिरची, फरसबी या भाज्या बारीक चिरून त्या चांगल्या परतायच्या. त्यात आता पोळ्यांचे उभे तुकडे घालून ढवळून घ्या. यात मीठ, सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि मिर पूड घालून चांगले शिजवून घ्या.
शिळ्या पोळ्या चांगला भाजून घ्या. त्यानंतर त्याचे हाताने बारीक तुकडे करून घ्या. आता यात कांदा, शिमला मिरची या भाज्या चिरून टाका. त्यानंतर बेसनचे थोडे पीठ त्यात घालून मीठ, मसाला सगळं चवीनुसार टाकून सगळं मिश्रण एकजीव करा. आता भजीसारखं मिश्रण भिजवून घ्या आणि तेलात तळून घ्या.
शिळ्या पोळ्या आणि भात एकत्र करून त्यात मसाले, भाज्या आणि इतर साहित्य घालून उपमा करू शकतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)