लंडन : कोरोनाच्या संसर्गामुळे पुरुषांमधील पुरुषत्वावर परिणाम होत आहे. एका संशोधनात ही गोष्ट पुढे आली आहे. यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता कमी होत आहे. कोरोनामुळे इरेक्टाइल डिस्फंशनमध्ये वाढ होत आहे.
डेलीमेलच्या बातमीनुसार, रोम यूनिवर्सिटीच्या डॉक्टरांनी 100 अशा पुरुषांची चाचणी केली. ज्यांना कोरोना झाला होता. ज्यांचं सरासरी वय हे 33 वर्ष होतं. कोरोना संसर्गामुळे 28 टक्के पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिस्फंक्शन दिसलं. याचा अर्थ नपुंसक असा आहे.
महिलांच्या तुलनेत 1.7 टक्के अधिक पुरुषांचा मृत्यू झाला आगे. कोरोना व्हायरस श्वेत रक्त कणिकांवर परिणाम करतो. ज्यामुळे प्रतिकार शक्ती कमी होते.
नव्या संशोधनात असं समोर आलं की, कोरोनाशी लढण्यासाठी सेक्सुअल हार्मोंस मदत करतात. पण कोरोना संक्रमणानंतर सेक्स हार्मोंसचा स्तर ही खाली येत आहे. जी एक मोठी समस्या आहे. ज्यामुळे नंपुसक होण्याची भीती असते.
संशोधनात असं ही पुढे आल की, कोरोनामुळे महिलांमध्ये देखील वेगवेगळ्या समस्या तयार होतात. टेस्टोस्टेरोन लेवल घटल्यामुळे महिलांमध्ये मासिक पाळी संदर्भात अनेक समस्या येत आहेत.