PHOTOS

बीसीसीआयने 125 कोटी दिलेत, पण 'या' चार खेळाडूंना रुपया पण मिळणार नाही?

BCCI Prize Money Distribution : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्याचा पराक्रम केल्याने बीसीसीआयने खुश होवून तब्बल 125 कोटींचं बक्षिस जाहीर केलंय.

Advertisement
1/7
125 कोटींचं बक्षिस
125 कोटींचं बक्षिस

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलनंतर आयसीसीकडून साऊथ अफ्रिकेला 10 कोटी दिले तर टीम इंडियाला 20 कोटी मिळाले. परंतू बीसीसीआयने 125 कोटींचं बक्षिस जाहीर केलं.

2/7
बक्षिसाचं वाटप कसं?
बक्षिसाचं वाटप कसं?

टीम इंडियाला मिळालेल्या बक्षिसाचं वाटप कसं होणार? कोणाला किती रक्कम मिळणार? असे सवाल विचारले जात आहेत. तर राखीव खेळाडूंच्या पदरी बक्षिस येणार का? असा प्रश्न देखील उपस्थित होतोय.

3/7
कोणाला किती रक्कम?
कोणाला किती रक्कम?

समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, 125 कोटी बक्षीसाच्या रकमेचं टीम इंडियाच्या सर्व 15 खेळाडूंमध्ये वाटप होईल. परंतू इतर कोणाला किती रक्कम मिळणार? यावर अद्याप उत्तर मिळालं नाही.

 

4/7
राखीव खेळाडू
राखीव खेळाडू

टीम इंडियाचे 4 खेळाडू राखीव ठेवण्यात आले होते. ज्यामध्ये शुभमन गिल, आवेश खान, खलिल अहमद आणि रिंकू सिंग यांचा समावेश होता. 

5/7
शुभमन आणि आवेश
शुभमन आणि आवेश

शुभमन गिल आणि आवेश खान यांना सुपर 8 फेरीनंतर मायदेशी पाठवलं होतं. त्यामुळे या दोघांना बीसीसीआयचं बक्षिस मिळणार का? असा सवाल देखील उपस्थित होतोय.

6/7
बीसीसीआय
बीसीसीआय

राखीव खेळाडूंना रक्कम देयची की नाही, यावर अंतिम निर्णय बीसीसीआयचा असेल. तर राखीव खेळाडूंना बीसीसीआय वेगळी रक्कम देणार का? असा सवाल देखील विचारला जात आहे.

7/7
राहुल द्रविड
 राहुल द्रविड

प्रशिक्षक राहुल द्रविड या्ंच्यासह फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हांब्रे, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप, तीन थ्रोडाऊन तज्ज्ञ यांना किती रक्कम मिळणार हे पाहणं दैखील औत्सुक्याचं असेल.





Read More