Harbhajan Singh on Pakistan Champions Trophy : टीम इंडिया आगामी चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बीसीसीआयने मांडली आहे. याची आयसीसीने देखील याची दखल घेतलीये.
बीसीसीआयने घेतलेल्या भूमिकेवर आता टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंग याने आपलं मत व्यक्त केलं आहे.
भारताने पाकिस्तामध्ये का जावं? कोणीतरी मला याचं उत्तर द्यावं. पाकिस्तानमध्ये खेळाडूंच्या सुरक्षेचा मोठा मुद्दा आहे, असं भज्जीने म्हटलं आहे.
कारण तुम्ही पाहाल तर पाकिस्तानमध्ये दररोज कोणती ना कोणती घटना होत राहते, अशी टीका हरभजन सिंगने पाकिस्तानवर केली आहे.
पाकिस्तानात जाणं मला तरी सुरक्षित वाटत नाही. बीसीसीआयने योग्य निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या भूमिकेचं मी समर्थन करतो, असंही हरभजन सिंगने म्हटलंय.
टीम इंडियाच्या खेळाडूंच्या सेफ्टीशिवाय कोणतीही गोष्ट मोठी नाही, अशी स्पष्ट भूमिका हरभजन सिंगने मांडली आहे.