Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आयपीएल आणि त्यामागोमाग झालेला टी20 वर्ल्डकप. अनेक क्रिकेटपटूंच्या Better Half मैदानावर येऊन त्यांचं कौतुक करताना दिसल्या. पण, नताशा मात्र कुठंच नव्हती.
नताशाची अनुपस्थितीत हार्दिकसोबतच्या तिच्या नात्यात सारंकाही आलबेल नसल्याचे संकेत देऊन गेली. फार काळ हार्दिक आणि नताशा या दोघांनीही त्यांच्या नात्यासंदर्भात कोणतंही अधिकृत भाष्य केलं नाही.
अखेर सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या चर्चांनी जोर धरला होता त्या खऱ्या ठरवत टीम इंडियातील या खेळाडूनं आणि नताशानं त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातमीला दुजोरा देणारी पोस्ट केली.
चार वर्षांच्या नात्याला पूर्णविराम देत असताना आपण दोघांनीही या नात्यासाठी फार प्रयत्न केल्याचं सांगत हाती निराशाच आल्याचा सूर या पोस्टमधून आळवला. यावेळी मुलाच्या उत्तम भवितव्यासाठी आम्ही दोघंही त्याची जबाबदारी घेणार असल्याचंही या दोघांनी स्पष्ट केलं.
राहिला मुद्दा घटस्फोटानंतर नताशाला हार्दिकच्या संपत्तीपैकी किती वाटा मिळणार याविषयीचा, तर स्पोर्ट्सकिडाच्या वृत्तानुसार हार्दिक पांड्याच्या एकूण संपत्तीचा आकडा आहे 11 मिलियन डॉलर. म्हणजेच 91 कोटी रुपये.
क्रिकेट आणि जाहिराती त्याच्या कमाईचे मुख्य स्त्रोत असल्याचं म्हटलं जातं. हार्किदला आयपीएलमध्ये 15 कोटी रुपये इतकं मानधन मिळतं. बीसीसीआयमध्ये तो ए ग्रेड खेळाडू असल्यामुळं त्याला दरवर्षी क्रिकेट बोर्डाकडून 5 कोटी रुपये मानधन मिळतं. याशिवाय त्याच्याकडे आलिशान कार, भलीमोठी घरं, विविध ब्रँडसोबत असणारे करार या माध्यमातून मिळणारा फायदा अशी कोट्यवधींची संपत्ती आहे.
हार्दिकनं घटस्फोटाची घोषणा करण्यापूर्वीच त्याच्या आणि नताशामध्ये वाटाघाटीवरून झालेल्या व्यवहाराची टक्केवारी समोर आली होती. जिथं हार्दिकला त्याच्या एकूण संपत्तीचा 70 टक्के भाग नताशाला देणं अपेक्षित असल्याचं म्हटलं गेलं. दरम्यान, या व्यवहारासंदर्भात होणतीही अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही.
संपत्तीची वाटणी नेमकी कशी होणार यावर प्रश्नचिन्हं अद्याप कायम असलं तरीही हार्दिक आणि नताशाच्या नात्यात आलेला हा दुरावा चाहत्यांच्या मात्र जिव्हारी लागला आहे हे खरं.