Diwali 2024 : दिवाळी म्हटलं की कुटुंब एकत्र येण्यापासून ते अगदी कल्ला करेपर्यंत धमाल सुरू असते. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा हा सण अगदी याच उत्साहानं साजरा करताना दिसत आहेत.
अशा या जहीर खाननं पत्नी सागरिका घाटगे हिच्यासमवेत नुकताच दिवाळीचा सण साजरा केला.
राहत्या घरी जहीर आणि सागरिकानं कमाल पेहराव करत या सणाचं स्वागत केलं.
फराळ आणि कमालीचा उत्साह हा त्यांच्या या सेलिब्रेशनमध्ये लक्ष वेधून गेला.
सागरिका आणि जहीरनं सोशल मीडियावर त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले.
पारंपरिक फुलांची रांगोळी, समईत तेवणारी वात, देवघर असं एकंदर चित्र पाहता दिवाळीचा हा सण या स्टार जोडीनं अतिशय उत्साहात साजरा केल्याचं पाहायला मिळालं.
सोशल मीडियावर त्यांनी फोटो शेअर करताच अनेकांनी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छासुद्धा दिल्या.
जहीर आणि सागरिका कायमच सण- उत्सव साजरा करत त्यांचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात.
यंदाची दिवाळीसुद्धा यास अपवाद ठरली नाही. त्यांच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी कमाल प्रेम दिल्याचं पाहायला मिळालं.
(छाया सौजन्य- जहीर खान/ इन्स्टाग्राम)