ronaldo and georgina engagment ring price : जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो याने त्याची गर्लफ्रेंड आणि पार्टनर जॉर्जिना रॉड्रिग्जशी साखरपुडा केला. मागच्या अनेक वर्षांपासून ही जोडी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. जॉर्जिनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो आणि त्याला साजेसं कॅप्शन देत गोड बातमी शेअर केली.
जवळपास आठ वर्षांपासून जॉर्जिना रॉड्रिग्ज आणि रोनाल्डो हे एकत्र राहत आहेत. सोशल मीडियावर त्याने जॉर्जिना रोड्रिग्जने अंगठीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. रोनाल्डोने तिला प्रपोज केलं असून जॉर्जिना रॉड्रिग्जने रोनाल्डोचं हे प्रपोजल स्वीकारत 'Yes'असं म्हटलं आहे.
सोशल मीडियावर जॉर्जिना रॉड्रिग्जनाने ही बातमी शेअर केल्यापासून रोनाल्डोने तिला दिलेल्या रिंगची किंमत काय असेल याबाबत चर्चा सुरु झाली आहे. रोनाल्डोने गर्लफ्रेंडला दिलेली ही अंगठी 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त लांब असून त्याच्या मधोमध अंडाकार हिरा आणि दोन छोटे रत्न लावण्यात आले आहेत.
अंगठीच्या ऑफिशल किंमतीबाबत काही अधिकृत माहिती मिळाली नसली तरी असं म्हटलं जातंय की या अंगठीची किंमत ही जवळपास 20 लाख डॉलर ते 50 लाख डॉलरपर्यंत असू शकते. भारतीय रुपयांमध्ये याची किंमत ही जवळपास 16.5 ते 41 कोटींपर्यंत असू शकते.
ब्रियोनी रेमंडनुसार, या अंगठीत असलेला हिरा हा 25-30 कॅरेटच्या दरम्यान असू शकतो. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हा हिरा कमीत कमी 15 कॅरेटचा असू शकतो.
फ्रॅंक डार्लिंगचे संस्थापक केगन फिशरनुसार दोन्ही बाजूंचे हिरे जवळपास 1 कॅरेटचे असू शकतात. लॉरियल डायमंड्सच्या लॉरा टेलर म्हणतात की अंगठीची किमान किंमत 2 मिलियन अमेरिकी डॉलर असेल, तर रेअर कॅरेटचे CEO अजय आनंद यांनी अंगठीची किंमत 5 मिलियन अमेरिकी डॉलर पर्यंत असेल असा अंदाज लावला आहे.
जॉर्जिना रॉड्रिग्ज ही एक मॉडेल असून रॉड्रिग्जने प्रतिष्ठित फॅशन ब्रँड सोबत काम केलं आहे. यात गुच्ची, प्रादा आणि चॅन सारख्या लक्झरी ब्रँडचा समावेश आहे.
रोनाल्डो आणि जॉर्जिना यांची पहिली भेट 2016 मध्ये एका गुच्ची स्टोअरमध्ये झाली होती. जॉर्जिया तिथे काम करत होती, पहिल्या भेटीनंतर त्यांची मैत्री वाढली आणि नंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. रोनाल्डो आणि रॉड्रिग्ज हे दोघे पाच मुलांचे पालक आहेत.
रोनाल्डो मॅन्चेस्टर युनायटेड, रिअल मद्रिद, जुवेंट्ससाठी खेळल्यानंतर आता सौदी अरबमधील अल नासर क्लबसाठी खेळतो. याशिवाय पोर्तुगालच्या फुटबॉल संघासाठीसुद्धा तो महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी ओळखला जातो.