Cristiano Ronaldo Becomes Highest Paid Star On Instagram: इन्टाग्रामवर चर्चा असते ती म्हणजे मोठमोठ्या सेलिब्रेटींची. त्यांच्या भन्नाट पोस्टिंगमुळे ते कायमच चर्चेत असतात. त्यांचे रिल्स तर कामयच चर्चेत असतात. आता चर्चा आहे ती म्हणजे अशा एका सेलिब्रेटीची जो एका पोस्टवर अब्जावधी रूपये घेतो आणि हे घेणारा तो एकमेव सेलिब्रेटी ठरला आहे.
सेलिब्रेटींच्या इन्स्टाग्राम पोस्टची अनेकदा चर्चा रंगताना दिसते. त्यातून ते इन्टाग्राम पोस्टवरून या सेलिब्रेटींना किती पैसे मिळतात. याचीही चांगलीच चर्चा रंगलेली असते.
क्रिस्तियानो रोनाल्डो हा फुटबॉल प्लेअर आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. त्याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते.
सध्या त्यानं बड्या सेलिब्रेटींना मागे टाकत इन्टाग्रामवरील सर्वात जास्त म्हणजेच हायेस्ट इन्टाग्राम पेड स्टारचा मान पटकावला आहे. त्यानं चक्क केली जेनर या अभिनेत्यालाही मागे टाकलं आहे.
त्याचे इन्टाग्रामवर 597M फॉलोवर्स आहेत. सोबत इन्टाग्रामवरून तो 1.87 मिलियन डॉलर प्रत्येका पोस्टमागे कमावतो असं डिली मेल ऑनलाईननं आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे.
फूटबॉल म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे क्रिस्तियानो रोनाल्डो आणि मेसी हे दोन प्लेअर. त्यातून इन्टाग्रामवरून क्रिस्तियानो रोनाल्डोसह मेसी हाही तितकाच लोकप्रिय आणि हायेस्ट पेड इन्टाग्राम स्टार आहे. परंतु क्रिस्तियानो रोनाल्डो त्यांनाही मागे टाकलं आहे.
सध्या इन्टाग्रामवरील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीपैंकी तो एक आहे. त्यामुळे त्याची सर्वाधिक चर्चा सुरू आहे.