Cruiser Car Accident: या कारमधून 13 जण प्रवास करत होते. मात्र पहाटेच्या सुमारास या कारचा भीषण अपघात झाला. अपघाताचे थक्क करणारे फोटो
एमपीएलचा सामना पाहून येताना काळाचा घाला; दोघांचा मृत्यू अनेकजण जखमी! नेमकं घडलं काय जाणून घ्या या फोटोंच्या माध्यमातून
इंडियन प्रिमिअर लीगनंतर सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रिमिअर लीगची चांगलीच चर्चा आहे. मात्र या लीगमधील क्रिकेट सामने पाहण्यासाठी चाहत्यांच्या एका कारचा भीषण अपघात झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीतील 13 मुले एमपीएल अर्थात महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे क्रिकेट सामने बघण्यासाठी पुणे येथे गेले होते.
आहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यामध्ये पहाटेच्या सुमारास क्रूझर कारचा अपघात होऊन दोन जण ठार झालेत.
पुण्यावरुन परतत असताना पहाटे नेवासा तालुक्याच्या हद्दीतून जाणाऱ्या अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावर हा भीषण अपघात झाला.
या अपघातामध्ये एकूण 11 जण जखमी झाले आहेत.
भरधाव वेगातील क्रूझर कार थेट ट्रकला मागून जाऊन धडकली.
हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचे छत अक्षरशः उडून गेले.
क्रेनच्या सहाय्याने कार बाजूला काढून वाहतूक सुरु करण्यात आली आहे. जखमींवर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.