Shubman Gill: मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्याच चेन्नईने गुजरातवर विजय मिळवला आहे.
17 व्या सिझनमध्ये गुजरात टायटन्सने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला.
मात्र मंगळवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरातचा पराभव केला.
यंदाच्या सिझनमधील पहिल्या पराभवानंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिल म्हणाला, आम्ही सामन्याच्या सुरुवातीला आशा करत होतो की आम्ही 190-200 रन्सचा पाठलाग करू शकू.
गिल म्हणाला, फलंदाजीसाठी ही विकेट चांगली होती पण आम्ही चांगली फलंदाजी करू शकलो नाही त्यामुळे आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं.
चेन्नईची गोलंदाजी उत्कृष्ट होती आणि त्यांनी आम्हाला क्रीझवर अधिक काळ टिकण्याची संधी दिली नाही. हे आमच्यासाठी दुर्दैवी होतं, असंही त्याने म्हटलं.
सीझनच्या सुरुवातीला आमच्यासोबत असं घडलं याचा मला आनंद आहे, असं गिल म्हणाला.
शुभमनने सांगितलं की, एक कर्णधार म्हणून मला या सामन्यात खूप काही शिकायला मिळाले. गेल्या दोन वर्षांत आम्ही अंतिम फेरीत धडक मारली असून भविष्यातील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू