Cycling Effects: सायकलिंगचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर काय परिणाम होतो हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक अभ्यास केला.
Effects of Cycling: आरोग्य आणि फिटनेस राखण्यासाठी सायकल चालवण्याचा सल्ला दिला जातो. सायकलिंगमुळे आरोग्य निरोगी राहते तसेच वजन कमी करण्यास मदत होते. नियमित सायकलिंगमुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते. तसंच स्टॅमिना वाढवण्यास मदत होते. पण सायकलिंगचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो, असे तुम्ही ऐकले आहे का?
सायकलिंगमुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित इतर आजार होण्याची शक्यता कमी होते. पण सायकल चालवल्याने पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो का? काही काळापूर्वी झालेल्या एका अभ्यासात याचा शोध घेण्यात आला. नवी मुंबईतील मेडिकोव्हर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉ. विनय धिफळे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
सायकलिंगचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर काय परिणाम होतो हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक अभ्यास केला.सायकल चालवल्याने पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारच्या लैंगिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही, असे या अभ्यासातून समोर आले.
इरेक्टाइल डिसफंक्शन आणि वंध्यत्वाचा सायकलिंगशी संबंध नाही. पुरुष तासनतास सायकल चालवू शकतात. पण, त्यांनी जास्त काळ सायकल चालवणे टाळावे, असा सल्लाही देण्यात आला.
सायकल चालवल्याने पायांच्या नसांवरील दबाव कमी होण्यास मदत होते. पुरुषांमधील प्रजनन क्षमतेशी संबंधित समस्यांसाठी इतर कारणे जबाबदार असू शकतात, असे तज्ञ सांगतात.
पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर सायकलिंगचा कोणताही दुष्परिणाम दिसून येत नाही. असे असले तरी पुरुषांना प्रोस्टेटची समस्या उद्धवू शकते. सुमारे 50 टक्के पुरुष जे भरपूर सायकल चालवतात त्यांना भविष्यात प्रोस्टेट कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो, असे अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात.
परिणामांनुसार, पुरुषांच्या प्रोटीन पीएसएची पातळी वाढू शकते, जी प्रोस्टेट समस्या किंवा कर्करोग दर्शवू शकते. त्याच्या वाढीमुळे सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. जे पुरुष 8.5 तासांपेक्षा जास्त सायकल चालवतात त्यांना प्रोस्टेट संबंधित समस्यांचा धोका जास्त असतो, असे तज्ञ सांगतात.
दरम्यान फिट राहण्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन वर्कआउटमध्ये सायकलिंगचा समावेश करू शकता. सायकल चालवल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच, हे रक्ताभिसरण सुधारते आणि रोगांपासून आपले संरक्षण होते, असे तज्ञ दीपक यादव सांगतात.
पुरुष त्यांची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी त्यांच्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करू शकतात. सकाळी योगासने आणि ध्यान केल्याने देखील प्रजनन क्षमता सुधारली जाऊ शकते. तसेच पौष्टिक आहाराचे सेवन केल्याने तुम्ही आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर सहज मात करू शकता, असा सल्ला देण्यात आला आहे.