D Gukesh Fans Troll Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांना गुकेशच्या चाहत्यांकडून ट्रोल केलं जात आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात...
जागतिक स्पर्धा जिंकणाऱ्या डी. गुकेशला मोठा आर्थिक फटका बसल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. नेमकं घडलंय काय पाहूयात...
भारताचा ग्रँडमास्टर गुकेश दोम्माराजूने बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये चीनच्या डिंग लिरेनवर मात करत 18 व्या वर्षी बुद्धिबळ इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता बनण्याचा मान पटकावला. महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदनंतर असा पराक्रम करणारा गुकेश हा दुसराच भारतीय जगज्जेता ठरला आहे.
डी. गुकेशला जगज्जेता पदाबरोबरच बक्षिसाची रक्कम म्हणून 11 कोटी रुपये मिळाले आहेत. बुद्धीबळ स्पर्धा आयोजित करणाऱ्या 'फिडे'च्या नियमांनुसार, जगज्जेता पदाच्या स्पर्धेत प्रत्येक सामना जिंकल्यानंतर खेळाडूला 2 लाख अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 1.68 कोटी रुपये मिळतात.
उरलेली रक्कम अंतिम सामना खेळणाऱ्या दोन खेळाडूंमध्ये वाटून दिली जाते. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना दिली जाणारी एकूण रक्कम ही 2.5 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 21 कोटी रुपये इतकी आहे.
गुकेशने या स्पर्धेमध्ये एकूण 3 सामने जिंकले. त्याचे त्याला 6 लाख अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 5.04 कोटी रुपये मिळाले. डिंग लिरेन दोन सामने जिंकल्याने त्याला 4 लाख अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 3.36 कोटी रुपये मिळाले. उतरलेली 1.5 मिलियन रुपयांची रक्कम दोघांना वाटून देण्यात आली.
म्हणजेच गुकेशला जेतेपदाबरोबरच बक्षिस म्हणून 1.35 मिलियन म्हणजेच 11.34 कोटी रुपये मिळाले. वर्ल्ड चेस चॅम्पियनशीप जिंकल्याने गुकेशची एकूण संपत्ती 21 कोटींवर पोहोचली आहे.
भारतीय कायद्यानुसार, गुकेशची कमाई पाहिल्यास त्याला 30 टक्के कर भरावा लागणार आहे. म्हणजेच त्याला 3 कोटींचा आयकर भरावा लागणार. यावर अतिरिक्त उपकरही आकारला जाणार आहे. त्यामुळेच गुकेशला एकूण 4.67 कोटी रुपये आयकर भरावा लागणार आहे.
मात्र गुकेशकडून एवढा कर आकारला जाणार असल्याच्या मुद्द्यावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी तर 11 कोटी जिंकून गुकेशच्या वाटल्याला केवळ 6 कोटी येणार हे फार धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे.
बऱ्याच जणांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांचे मिम्स यावरुन पोस्ट केले आहेत. एकाने गुकेश निर्मला यांना नाही पराभूत करु शकला असं म्हटलं आहे.
काहींनी स्क्रीनशॉट शेअर करत गुकेशला जिंकलेल्या रक्कमेच्या 42 टक्के आयकर भरावा लागणार असल्याचं म्हटलं आहे.