वाढत्या वयोमानानुसार स्मरणशक्ती कमजोर होते. परंतू काही जणांना ऐन तारूण्यामध्येही कोणती गोष्ट कुठे ठेवलीय याचं भान नसतं. साध्या साध्या गोष्टी कुठे ठेवलायत? हे विसरतात. यामध्ये आहाराचादेखील समावेश होतो.
जंकफूड खाण्याची सवय मेंंदूच्या कार्यावर परिणाम करते. त्यामुळे चटकदार वाटत असले तरीही अशा पदार्थांना आहारात टाळा.
आहार पोषक असणं आवश्यक आहे. याकरिता अंड, रेड मीट, दूध अशा पोषक घटकांचा आहारात समावेश करा
काही जणांना सतत गोड खाण्याची सवय असते. साखरेचे अतिसेवन इतर अनेक आजारांना कारणीभूत असते. पण त्याचा परिणाम स्मरणशक्तीवर होतो. म्हणून साखरेऐवजी गूळ, मध यांंचा वापर करा.
ताण हलका करण्यासाठी अनेकदा लोकं सिगारेटसारख्या व्यसनाच्या अधीन होतात. पण यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो.