हिंद महासारगातील एका भागामध्ये ज्वालामुखीपाशी अगदी तळाशी विचित्र प्रकारच्या जलचरांचा समुह पाहायला मिळाला. यामध्ये काही असे मासे दिसले जे पाहून वैज्ञानिकही हैराण झाले. ऑस्ट्रेलियातील म्यूझियम विक्टोरिया रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये यासंबंधीचं संशोधन करण्यात आलं.
ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला असणाऱ्या पर्थच्या उत्तर - पश्चिमेला जवळपास 1708 मैल (2750 किलोमीटर) अंतरावर साधारण 290,213 चौरस मैलांच्या (467,054 चौरस किलोमीटर) क्षेत्रात ऑस्ट्रेलियापासून अगदी दूर कोकोस (कीलिंग) द्वीप समुद्री पार्क अभियानादरम्यान हे जीव सापडले.
सापडलेल्या बेटांमध्ये 27 लहानमोठ्या बेटांचा समावेश आहे. ज्यामध्ये सफेद वाळू असणाऱ्या समुद्र किनाऱ्यापासून ताडाच्या झाडांचागी समावेश आहे. या साऱ्यामध्ये तीन मैलांहून अधिक खोल अंतरावर असणाऱ्या एका ब्लाइंड ईलचाही शोध लागला.
संशोधकांना सापडलेल्या या जीवांमध्ये तीन डोळे असणारा एक जलचरही सापडला. यामध्ये सापडलेला आणखी एक जीव होता हाईफिन लिजर्ड. ज्यामध्ये ओवरिज आणि टेस्टीज एकत्र होते.
निरीक्षणामध्ये एक असा मासा आढळला, ज्याचे डोळे जमिनीला चिकटलेले होते.
सर्वात विचारात टाकणारा मासा होता, स्लोअन्स वाइपरफिश (Sloane’s Viperfish). कारण, त्याचा आकार प्रचंड घाबरवणारा होता.